खरंच हिरवी मिरची खाल्ल्याने शुगर कमी होते? संशोधनात सिद्ध झाली धक्कादायक बाब, त्वरित समजून घ्या
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
हिरवी मिरची मधुमेह नियंत्रणासाठी फायदेशीर ठरू शकते. संशोधनानुसार, हिरव्या मिरचीच्या सेवनाने ब्लड शुगर कमी होऊ शकतो आणि इन्सुलिनची गरज कमी होते. टाइप 2 मधुमेहींसाठी हा नैसर्गिक उपाय लाभदायक ठरू शकतो.
मधुमेह हा एक असा आजार आहे, ज्याने कोट्यवधी लोकांना आपल्या कवेत घेतले आहे. पुढील काही दशकांमध्ये मधुमेह महामारीचे रूप धारण करू शकतो. मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी औषध आणि इन्सुलिनच्या डोससोबतच, खाण्यापिण्यावर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. अनेक खाद्यपदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवता येते आणि मधुमेहावर नियंत्रण मिळवता येते. अनेक लोक हिरव्या मिरच्या रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी प्रभावी मानतात. याबाबत काही अभ्यासही झाले आहेत, ज्यात आश्चर्यकारक तथ्ये समोर आले आहेत.
हिरव्या मिरचीमुळे रक्तातील साखर राहते नियंत्रणात
वैद्यकीय अहवालाच्या बातमीनुसार, ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की हिरव्या मिरच्या खाल्ल्याने हृदयाची गती कमी होते आणि रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी इन्सुलिनची गरज कमी होते. विशेषतः टाइप 2 मधुमेहाच्या रुग्णांसाठी मिरचीचे सेवन खूप फायदेशीर ठरू शकते. संशोधक शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, हिरव्या मिरच्या खाल्ल्याने केवळ मधुमेहच नाही तर हृदयविकाराचा धोकाही कमी होऊ शकतो. यापूर्वीच्या अभ्यासात असे दिसून आले होते की हिरव्या मिरच्या खाल्ल्याने इन्सुलिनची गरज कमी होऊ शकते.
advertisement
शास्त्रज्ञांनी हिरव्या मिरचीच्या सेवनाला दिला दुजोरा
संशोधकांच्या मते, टाईप 2 मधुमेह नियंत्रित करण्याचा हिरवी मिरची हा एक सोपा मार्ग असू शकतो. या अभ्यासात सहभागी असलेल्या एका संशोधकाचे म्हणणे आहे की भविष्यात हिरवी मिरची एक महत्त्वाचे आहाराचे पूरक बनू शकते, जे मधुमेह आणि हृदयविकार यांसारख्या गंभीर समस्यांच्या उपचारात उपयुक्त ठरू शकते. त्यांचा असा विश्वास आहे की, ग्लूकोज इनटॉलरेंस आणि टाइप 2 मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये हिरव्या मिरच्यांचे सेवन केल्याने जेवणानंतरची रक्तातील साखर, इन्सुलिन आणि इतर धोके लक्षणीयरित्या सुधारू शकतात. या संशोधनाचा उद्देश हा होता की हिरव्या मिरच्यांचे सेवन टाइप 2 मधुमेह आणि ग्लूकोज इनटॉलरेंस असलेल्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकते का? या संशोधनाच्या निकालांनी हिरव्या मिरच्यांच्या फायद्यांची पुष्टी केली आहे.
advertisement
हे ही वाचा : केस गळतीच्या समस्येने त्रस्त आहात? तर 'हा' उपाय खास तुमच्यासाठी, फक्त 'इतक्या' दिवसात मिळतो रिझल्ट
हे ही वाचा : किचनमधील या वस्तुचे आहेत चमत्कारिक फायदे, महत्त्वाचे आजार होतात बरे, फक्त या पद्धत्तीने करा सेवन
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 29, 2025 12:59 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
खरंच हिरवी मिरची खाल्ल्याने शुगर कमी होते? संशोधनात सिद्ध झाली धक्कादायक बाब, त्वरित समजून घ्या