प्रत्येक व्हिटॅमिनचं कार्य वेगवेगळं आहे. त्यातील जीवनसत्व अ म्हणजेच व्हिटॅमिन ए आपल्या शरीरातल्या महत्वाच्या गोष्टींसाठी आवश्यक आहे. दृष्टी, त्वचा, हाडं, यासाठी हे जीवनसत्व गरजेचं आहे. दूध, अंडी, गाजर यामधून पुरेसं व्हिटॅमिन ए मिळू शकतं. 'व्हिटॅमिन ए' शरीराला कशासाठी आवश्यक आहे समजून घेऊया.
1. दृष्टीत सुधार
व्हिटॅमिन ए चं सर्वात महत्वाचं कार्य म्हणजे आपल्या डोळ्यांची काळजी घेणं. हे डोळयातील पडदामध्ये रेटिनल प्रोटीन तयार करण्यास मदत करते, जे दृष्टीसाठी आवश्यक आहे. हे विशेषतः रात्री पाहण्यास मदत करतं. व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे दृष्टी कमजोर होऊ शकते. त्यामुळे व्हिटॅमिन ए डोळ्यांची दृष्टी टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
advertisement
Digestion : ओवा - बडिशेपेचं पाणी प्या, पोटाच्या आरोग्यासाठी उत्तम पर्याय
2. त्वचेचं आरोग्य
व्हिटॅमिन ए त्वचेसाठी देखील खूप फायदेशीर आहे. यामुळे पेशींचं पुनरुत्पादन करण्यास मदत होते, ज्यामुळे त्वचा निरोगी, गुळगुळीत राहते. तसंच सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. व्हिटॅमिन ए च्या नियमित सेवनानं त्वचेची चमक देखील वाढू शकते.
3. रोगप्रतिकारशक्ती
आपली प्रतिकारशक्ती मजबूत करण्यात व्हिटॅमिन ए ची मोठी भूमिका आहे. यामुळे शरीर संक्रमण आणि रोगांशी लढण्यासाठी तयार होतं. याशिवाय श्वसनसंस्थेचे रक्षण आणि शरीराला श्वसनाच्या संसर्गापासून संरक्षण करण्यासाठी व्हिटॅमिन ए महत्त्वाचं आहे.
4. हाडांचं आरोग्य
व्हिटॅमिन ए मुळे हाडं मजबूत ठेवण्यासाठी मदत होते. हाडं निरोगी ठेवण्यासाठी हा घटक महत्त्वाचा आहे. याशिवाय, व्हिटॅमिन ए कॅल्शियम आणि फॉस्फरस सारख्या घटकांचं शोषण वाढवतं, जे हाडांच्या निर्मितीस मदत करतात.
Eye Care : डोळ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष नको, योग्य आहार, डोळ्यांचे व्यायाम नक्की करा
5. प्रजनन
प्रजनन संस्थेच्या आरोग्यासाठीही व्हिटॅमिन ए देखील महत्त्वाचं आहे. हे स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये हार्मोनल संतुलन राखण्यास मदत करते आणि गर्भधारणेच्या प्रक्रियेत देखील उपयुक्त ठरू शकते.
'व्हिटॅमिन ए' साठी हे पदार्थ खा
गाजर: गाजरात भरपूर बीटा कॅरोटीन असतं, जे शरीरात व्हिटॅमिन ए मध्ये रुपांतरित होतं.
मासे: ट्राऊट आणि सॅल्मनसारखे मासे व्हिटॅमिन ए चा चांगला स्रोत आहेत.
रताळे: रताळ्यामध्ये बीटा-कॅरोटीन देखील भरपूर असतं, ज्यामुळे व्हिटॅमिन एची पातळी वाढते.
भोपळा: भोपळ्यामध्ये असलेल्या व्हिटॅमिन ए त्वचा आणि डोळ्यांसाठी फायदेशीर आहे.
दूध आणि चीज: दूध आणि चीज 'व्हिटॅमिन ए' चे आणि प्रथिनांचे देखील चांगले स्रोत आहेत.
पालक: पालक आणि इतर हिरव्या पालेभाज्या हे व्हिटॅमिन ए चे उत्कृष्ट स्त्रोत आहेत.
अंडी: अंड्यांमध्ये व्हिटॅमिन ए तसंच इतर पोषक घटक असतात.