प्रथिनांची कमतरता पूर्ण करण्यासाठी फक्त अंडीच खायला हवी असं नाही, शाकाहारी पदार्थांमध्येही भरपूर प्रथिनं असतात हे लक्षात घेणं आवश्यक आहे. प्रत्येकाच्या शरीराला किती प्रथिनांची आवश्यकता आहे हे व्यक्तीचं वय, लिंग आणि शारीरिक हालचालींवर अवलंबून असतं. शरीरात प्रथिनांची कमतरता भरुन काढण्यासाठी, अंडी किंवा मांस खाण्याचा सल्ला देतात. यासाठी शाकाहारी पदार्थांची एक यादी लक्षात ठेवा जेणेकरुन, कोणत्या शाकाहारी पदार्थात प्रथिनं आहेत, ज्याचा तुम्ही तुमच्या आहारात समावेश करू शकता.
advertisement
सोयाबीन
सोयाबीन हा वनस्पती- उत्पादित प्रथिनांचा स्त्रोत आहे, ज्यात 100 ग्रॅममध्ये सुमारे 29 ग्रॅम प्रथिनं मिळू शकतात.
मटार
100 ग्रॅम मटारमध्ये सुमारे 9 ग्रॅम प्रथिनं असतात. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी, मटारमध्ये मुबलक प्रमाणात मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात.
Walking : वयानुसार ठरवा चालण्याचं गणित, रोज चाला, वजन नियंत्रणात ठेवा
हरभरा
हरभरा डाळीमध्ये 100 ग्रॅममध्ये सुमारे 19 ग्रॅम प्रथिनं असतात. स्नायूंना बळकट करण्यासाठी हरभरा उपयुक्त आहे.
शेंगदाणा
शेंगदाण्यात प्रति 100 ग्रॅम सुमारे 20 ग्रॅम प्रथिनं असतात. यामुळे तुमच्या शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो.
बदाम
100 ग्रॅम बदामात सुमारे 21 ग्रॅम प्रथिनं असतात. त्वचेसाठी आणि केसांसाठी हा प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. यामुळे चेहरा आणि केसांची चमक कायम राहते.
Scented Candles : सुगंधित मेणबत्त्यांमुळे होऊ शकते आरोग्याला हानी ! आताच व्हा सावध
टोफू
टोफू हे सोया उत्पादनाचा एक प्रकार आहे, ज्यामध्ये 100 ग्रॅममध्ये सुमारे 20 ग्रॅम प्रथिनं असतात.
राजमा
राजमा डाळीमध्ये 100 ग्रॅममध्ये तुमच्या शरीराला सुमारे 22 ग्रॅम प्रथिनं मिळू शकतात.
कडधान्यं - वनस्पती-आधारित या प्रथिनांमध्ये 100 ग्रॅम कडधान्यात अंदाजे 25 ग्रॅम प्रथिनं असतात.
सुका मेवा - 30 ग्रॅम अक्रोडमध्ये 4 ग्रॅम प्रथिनं आणि 30 ग्रॅम हेझलनटमध्ये 4 ग्रॅम प्रथिनं मिळू शकतात.