Walking : वयानुसार ठरवा चालण्याचं गणित, रोज चाला, वजन नियंत्रणात ठेवा 

Last Updated:

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, वयानुसार किती वेळ आणि कोणत्या वेगानं चालावं, हे जाणून घेणं महत्त्वाचे आहे. तरच तुम्ही तुमचे वजन कमी करण्याचं ध्येय साध्य करू शकाल. 

News18
News18
मुंबई : वजन कमी करण्यासाठी तुम्ही उपाय शोधत असाल आणि पैसे खर्च करणार असाल तर थांबा, ही माहिती वाचल्यानंतर निर्णय घ्या. कारण वयानुसार, लठ्ठपणा लवकर कमी करण्यासाठी तुम्ही दररोज किती मिनिटं चाललं पाहिजे याचं एक गणित आहे. ज्यामुळे वजन कमी करण्याच्या या टिप्स नक्की लक्षात ठेवा. लठ्ठपणा लवकर कमी करण्यासाठी, नियमित व्यायाम आणि निरोगी आहाराचं पालन करणं तर गरजेचं आहे, तरच वजन कमी करण्याचं ध्येय साध्य करू शकाल.
वजन कमी करण्यासाठी चालण्याचा व्यायाम अतिशय सोपा आणि प्रभावी मानला जातो. तुम्ही कोणत्याही वयात तुमच्या दिनचर्येत हा सोपा आणि परिणामकारक उपाय अवलंबू शकता. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, वयानुसार किती वेळ आणि कोणत्या वेगानं चालावं, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तरच तुम्ही तुमचं वजन कमी करण्याचं ध्येय साध्य करू शकाल.
advertisement
तुमच्या वयानुसार तुम्ही दररोज किती मिनिटं चाललं पाहिजे?
18-40 वर्ष: 45 ते 60 मिनिटं ( जलद गतीनं चाला. या व्यतिरिक्त, जर तुम्ही त्यात इंटरव्हल ट्रेनिंगचा समावेश केला तर, तुम्ही कधी वेगानं, कधी कमी वेगानं चालू शकता.)
40-60 वर्ष: 30 ते 45 मिनिटं चालणं आवश्यक आहे (या वयातील लोक मध्यम गतीनं चालू शकतात.)
advertisement
60 वर्षांवरील: 20 ते 30 मिनिटं (या वयातील लोकांसाठी कमी वेगानं चालणं चांगलं. आवश्यक असेल, तर तुम्ही दोन टप्प्यात चाला, यामुळे तुम्हाला थकवा जाणवणार नाही.)
दररोज चालण्याचे फायदे
लठ्ठपणा कमी होण्यास मदत
हृदयाचं आरोग्य सुधारतं
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त
स्नायू मजबुतीसाठी उपयुक्त
हाडं मजबूत करण्यासाठी उपयुक्त
ताण नियंत्रणासाठी उपयुक्त
advertisement
वजन कमी करण्याचे इतर मार्ग
कमी कॅलरीयुक्त पदार्थ खा, जास्त पाणी प्या, तणाव व्यवस्थापन शिका, पुरेशी झोप घ्या
लठ्ठपणा कमी करण्यासाठी चालणं हा एक सोपा आणि प्रभावी व्यायाम आहे, परंतु त्यासोबतच तुम्हाला योग्य आहाराचं पालन करणं देखील आवश्यक आहे.
advertisement
पालक, ब्रोकोलीसारख्या हिरव्या भाज्या खा. गाजर, वाटाणा, टोमॅटो, तसंच फळांमध्ये सफरचंद, संत्र, द्राक्ष,
पपई, अननसाचा समावेश असू द्या. प्रथिनांचं प्रमाण योग्य ठेवण्यासाठी चिकन, मासे, अंडी, डाळी, सोयाबीन खा.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Walking : वयानुसार ठरवा चालण्याचं गणित, रोज चाला, वजन नियंत्रणात ठेवा 
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement