Vitamin Deficiency : हात पाय सुन्न होत असतील तर वेळीच लक्ष द्या, जाणून घ्या कसा मिळेल आराम

Last Updated:

शरीरात जीवनसत्त्वांची कमतरता असेल तर आरोग्याशी संबंधित विविध समस्यांचा धोकाही वाढतो. काही वेळा, शरीरात मुंग्या आल्यासारखं वाटत असेल तर जीवनसत्वाची कमतरता हे त्यामागरचं कारण असू शकतं.

News18
News18
मुंबई: शरीरात जीवनसत्त्वांची कमतरता असेल तर आरोग्याशी संबंधित विविध समस्यांचा धोकाही वाढतो. काही वेळा, शरीरात मुंग्या आल्यासारखं वाटत असेल तर जीवनसत्वाची कमतरता हे त्यामागरचं कारण असू शकतं.
कधीकधी पाय किंवा हातात अचानक मुंग्या येतात असं जाणवतं. या मुंग्या अंगावर चढल्याचा भास होतो. कधीकधी हात आणि पाय पूर्णपणे सुन्न होतात. याचं कारण म्हणजे व्हिटॅमिनची कमतरता ज्यामुळे मज्जातंतूंवर परिणाम होतो. तुम्हालाही हात-पायांमध्ये मुंग्या येत असतील तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची.
advertisement
शरीरात व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे हात आणि पायांना मुंग्या येण्याची समस्या जाणवते. या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे मज्जातंतूंचं नुकसान होतं. तसंच, यामुळे न्यूरोलॉजिकल समस्या उद्भवू शकतात. व्हिटॅमिन बी 12 लाल रक्त पेशींच्या निर्मितीसाठी उपयुक्त आहे आणि लाल रक्तपेशी शरीरात ऑक्सिजन वाहून नेतात. अशा परिस्थितीत व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे ॲनिमिया होऊ शकतो.
advertisement
व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेची लक्षणं
- व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे, स्मरणशक्ती कमी होऊ शकते.
- या जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे मानसिक समस्या वाढू शकतात.
- मज्जातंतूंच्या नुकसानीमुळे, दृष्टी अस्पष्ट होते. यामुळे दृष्टी कमी होऊ शकते.
- शरीरात थकवा आणि अशक्तपणा कायम राहतो. कोणतंही काम करण्याची ऊर्जा जाणवत नाही.
- व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे लाल रक्तपेशींची कमतरता निर्माण होते ज्यामुळे ॲनिमिया होऊ शकतो.
advertisement
- मूडमध्ये झपाट्यानं बदल होतो आणि उदासीनता, चिंता आणि चिडचिड होण्याची शक्यता वाढते.
- मज्जातंतूंच्या नुकसानीमुळे संतुलन बिघडून चालण्यात किंवा धावण्यात अडचण येऊ शकते.
- हृदयाचे ठोके अनियमित होऊ लागतात.
- शरीराला योग्य ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्यामुळे स्नायूंमध्ये वेदना सुरू होतात.
advertisement
- व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेची लक्षणं नखांवर देखील दिसतात. नखं तपकिरी रंगाची होतात.
- व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे केस गळणं सुरू होतं.
व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता कशी कमी करता येईल ?
शरीरात व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असेल तर, व्हिटॅमिन बी 12 समृद्ध असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश केला जाऊ शकतो. मांस, मासे, दूध आणि अंडी हे व्हिटॅमिन बी 12 चे चांगले स्रोत आहेत. व्हिटॅमिन बी 12 फोर्टिफाइड पदार्थ जसं की न्याहारीसाठी तृणधान्यं आणि फोर्टिफाइड ब्रेडचा आहारात समावेश केला जाऊ शकतो.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Vitamin Deficiency : हात पाय सुन्न होत असतील तर वेळीच लक्ष द्या, जाणून घ्या कसा मिळेल आराम
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement