आयुर्वेद आणि पोषण तज्ज्ञांनी यावर एक उपाय सुचवला आहे. सकाळी कोमट पाण्यासोबत काही गोष्टींचं सेवन केल्यानं आतड्यांमधे साचलेली घाण निघून जाते आणि पचनसंस्था सुधारण्यासाठी मदत होते. या उपायामुळे विषारी पदार्थ बाहेर जायला मदत होते तसंच पोट हलकं राहतं.
Monsoon Diseases : पावसाळ्यातल्या या पाहुण्यांचं करु नका स्वागत, साथीच्या रोगांपासून राहा सावध
advertisement
पोटाच्या आरोग्यासाठीचा उपाय -
आयुर्वेदानुसार, भिजवलेला त्रिफळा, ओवा किंवा मध कोमट पाण्यासोबत घेतल्यानं आतडी स्वच्छ होण्यास मदत होते. आतड्यांमध्ये साचलेली घाण निघते शिवाय यामुळे पचनसंस्था देखील मजबूत करते.
या उपायाचे फायदे -
- विषारी पदार्थ काढण्यासाठी उपयुक्त - कोमट पाणी आणि त्रिफळामुळे आतड्यांमध्ये साचलेले विषारी पदार्थ बाहेर काढले जातात.
- पचन सुधारतं - या उपायामुळे पोट हलकं राहतं.
Dehydration : पाणी कमी प्यायल्याचे शरीरावर होतात परिणाम, पुरेसं पाणी प्या, शरीराची निगा राखा
- चयापचयाचा वेग वाढतो - शरीराचा चयापचय वेग सुधारतो, ज्यामुळे वजन नियंत्रित करण्यास देखील मदत होते.
- पोट फुगणं आणि गॅसपासून आराम - ओवा किंवा मध खाल्ल्यानं पोट फुगणं आणि गॅसची समस्या कमी होते.
सकाळी रिकाम्या पोटी, एक चमचा ओवा, त्रिफळा पावडर किंवा मध कोमट पाण्यात मिसळून घ्या. यामुळे पचन आणि आतड्यांशी संबंधित समस्या हळूहळू कमी होतील. आतडी स्वच्छ करण्यासाठी आणि पचन सुधारण्यासाठी हा घरगुती उपाय खूप फायदेशीर ठरू शकतो. योग्य आहार आणि निरोगी सवयींमुळे पचनसंस्था मजबूत करू शकता.
