Dehydration : पाणी कमी प्यायल्याचे शरीरावर होतात परिणाम, पुरेसं पाणी प्या, शरीराची निगा राखा
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
शरीराला योग्यरित्या कार्य करण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. पाणी पुरेसं नसेल तर डिहायड्रेशन म्हणजेच शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. बऱ्याच वेळा, पाण्याअभावी, अनेकांना उभं राहताना चक्कर येते किंवा अशक्तपणा जाणवतो. समस्या खूप गंभीर होण्यापूर्वी, शरीरात डिहायड्रेशनची लक्षणं दिसतात, ती ओळखली तर हा धोका टाळता येतो.
मुंबई : दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसानं हवा बदलली असं म्हणतानाच पुन्हा एकदा हवा बदलून उकडायला सुरुवात झाली. या बदलत्या हवेत आणि एरवीही पुरेसं पाणी पिणं अत्यावश्यक आहे, तरंच शरीराची कार्य व्यवस्थित सुरु राहतात.
पुरेसं पाणी प्यायलं नाही तर शरीरात काही लक्षणं दिसतात. योग तज्ज्ञांनी डिहायड्रेशनचे संकेत कसे ओळखायचे याविषयी माहिती दिली आहे. पाणी पुरेसं प्यायलं नाही तर शरीरात आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांचा शिरकाव होतो.
शरीराला योग्यरित्या कार्य करण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. पाणी पुरेसं नसेल तर डिहायड्रेशन म्हणजेच शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. बऱ्याच वेळा, पाण्याअभावी, अनेकांना उभं राहताना चक्कर येते किंवा अशक्तपणा जाणवतो. समस्या खूप गंभीर होण्यापूर्वी, शरीरात डिहायड्रेशनची लक्षणं दिसतात, ती ओळखली तर हा धोका टाळता येतो.
advertisement
ही लक्षणं वेळीच ओळखणं खूप महत्वाचं आहे. योग तज्ज्ञ मयूर कार्तिक यांनी इंस्टाग्राम अकाउंटवर याबद्दल एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये शरीरात पाण्याची कमतरता भासल्यास कोणती लक्षणं दिसून येतात याविषयीची माहिती दिली आहे.
डिहायड्रेशनची लक्षणं
advertisement
गडद रंगाची लघवी होणं -
शरीराला पुरेसं पाणी मिळालं नाही तर लघवीचा रंग गडद होऊ लागतो. गडद पिवळा किंवा नारिंगी रंगाचा लघवीचा रंग म्हणजे शरीराला पाण्याची गरज आहे.
बद्धकोष्ठता -
पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी पाण्याची मदत होते. शरीरात पाण्याची कमतरता असते तेव्हा अन्न पचवण्यास अडचण येते. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते. एखाद्या व्यक्तीला शौचास जाण्यास त्रास होतो. पाण्याअभावी, मल कठीण होतं आणि व्यक्तीला बराच वेळ बाथरूममध्ये बसावं लागतं.
advertisement
डोकेदुखी आणि थकवा -
पुरेसं पाणी प्यायलं नसेल तर डोकं दुखतं. यामुळे शरीरात थकवा जाणवतो. पाणी पुरेसं असेल तर ही समस्या उद्भवत नाही. डिहायड्रेशनवर मात करण्यासाठी, पाण्याव्यतिरिक्त, फळांचा रस, भाज्यांचा रस आणि नारळ पाणी पिणं हे देखील चांगले पर्याय आहेत.
advertisement
मुख दुर्गंधी -
पाणी पुरेशा प्रमाणात प्यायलं नाही तर तोंडात बॅक्टेरिया साचून राहतात आणि लाळेचं उत्पादन देखील कमी होतं. यामुळे तोंडातून दुर्गंधी येऊ लागते. पुरेसं पाणी प्यायल्यानं तोंडातील घाण निघून जाते आणि तोंडात लाळही तयार होत राहते.
स्नायूंमध्ये वेदना -
योग्य प्रमाणात पाणी प्यायल्यानं रक्तप्रवाह देखील सुधारतो. याउलट, पुरेसं पाणी प्यायलं नाही तर रक्तप्रवाहात अडथळा येतो आणि त्यामुळे स्नायूंमध्ये वेदना आणि कडकपणा जाणवतो.
advertisement
तोंड आणि घसा कोरडं होणं -
शरीरात पाण्याची कमतरता असेल तर तोंड आणि घशात कोरडेपणा जाणवतो. वारंवार तहान लागत असेल तर शरीरात पाण्याची कमतरता असल्याचा तो संकेत आहे.
त्वचा कोरडी होणं -
शरीरात आतून पाण्याची कमतरता असेल तर त्याचा परिणाम बाहेरूनही दिसून येतो. ज्यांच्या शरीरात पुरेसं पाणी नसतं, त्यांची त्वचा खडबडीत आणि कोरडी दिसते. हा कोरडेपणा दूर करण्यासाठी, पुरेसं पाणी पिणं शरीराची गरज आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 30, 2025 12:48 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Dehydration : पाणी कमी प्यायल्याचे शरीरावर होतात परिणाम, पुरेसं पाणी प्या, शरीराची निगा राखा










