Hair Care : पावसाळ्यासाठी बनवा नैसर्गिक हेअर मास्क, कोरडे - कडक केस होतील मऊ
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
पावसाळ्यात अनेकदा केस निर्जीव होतात. ज्यामुळे केसांची काळजी घेणं कठीण होतं. नैसर्गिक हेअर मास्कनं केसांची चांगली काळजी घेता येते. यासाठी मुख्यत: जास्वंदीच्या फुला - पानांचा वापर होतो.
मुंबई : निसर्गानं अगदी काही तासांत गीअर बदलला त्यामुळे आतापर्यंत खूप उकडत होतं, त्याची जागा आता पाऊस आणि गार वाऱ्यांनी घेतली. या गार आणि जोरदार वारा, पावसात केस उडतात आणि विखुरलेले दिसतात.
पावसाळ्यात केस कोरडे, वेडेवाकडे होतात. यासाठी पोषणतज्ज्ञांनी एक हेअर मास्क सांगितला आहे. यामुळे केस निर्जीव न दिसता मुलायम होतात. जास्वंदीच्या फुला-पानांपासून बनवला जाणारा हा नैसर्गिक हेअर मास्क घरी बनवता येतो.
advertisement
प्रसिद्ध सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी एका खास हेअर मास्कबद्दल माहिती दिली आहे. कोरडे आणि कडक केस यामुळे मुलायम होतात.
हेअर मास्क बनवण्यासाठी जास्वंदीची 4-5 ताजी फुलं, जास्वंदीची 5-6 कोवळी पानं, दोन चमचे कोरफड जेल,
advertisement
एक टेबलस्पून नारळ किंवा बदाम तेल आणि टाळू खूप कोरडा झाला असेल तर एक टेबलस्पून दही आवश्यक आहे.
हेअर मास्क बनवण्याची कृती -
सर्वप्रथम जास्वंदीची फुलं आणि पानं चांगली धुवून घ्या. मिक्सरमध्ये बारीक करून मऊ पेस्ट बनवा. त्यात कोरफड जेल आणि नारळ किंवा बदाम तेल घाला. टाळू खूप कोरडा झाला असेल तर थोडं दही देखील घालू शकता. हे मिश्रण पूर्ण केसांना लावा. तीस मिनिटं तसंच राहू द्या, नंतर कोमट पाण्यानं धुवा. शक्य असेल तर, शॅम्पू करू नका.
advertisement
केसांवर या मास्कचा चांगला परिणाम दिसण्यासाठी पोषणतज्ज्ञ आठवड्यातून एक ते दोन वेळा हा मास्क लावण्याचा सल्ला देतात.
पोषणतज्ज्ञांच्या मते, जास्वंदीमुळे केसांची वाढ चांगली होते आणि यामुळे टाळूला थंडावा मिळतो. कोरफड जेलमुळे केसांना खोलवर ओलावा मिळतो आणि केस मऊ होतात. या तेलामुळे केसांच्या मुळांना पोषण मिळतं आणि केस तुटण्याचं प्रमाण कमी होतं. दह्यानं कोरड्या टाळूला हायड्रेशन मिळतं म्हणजे टाळूला आवश्यक ओलावा - आर्द्रता मिळते आणि कोंड्याचं प्रमाण कमी होतं. रासायनिक उत्पादनांपेक्षा या नैसर्गिक उपायानं केसांची काळजी घेतली जाऊ शकते.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 28, 2025 6:00 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Hair Care : पावसाळ्यासाठी बनवा नैसर्गिक हेअर मास्क, कोरडे - कडक केस होतील मऊ








