मूत्रपिंड हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे, जो रक्त फिल्टर करण्याचं आणि विषारी पदार्थ काढून टाकण्याचं काम करतो. पण, मूत्रपिंडं योग्यरित्या कार्य करत नसतील तर शरीरात विषारी पदार्थ जमा होऊ लागतात, ज्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. पण यात एक चांगली बाब अशी की मूत्रपिंडाची शक्ती वाढवणं शक्य आहे आणि नैसर्गिकरित्या ते विषमुक्त करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो.
advertisement
Ashwagandha : उत्तम आरोग्यासाठी आयुर्वेदिक उपचारांची साथ - अश्वगंधाचा वापर ठरेल उपयुक्त
मूत्रपिंडाचं कार्य आणि महत्त्व
मूत्रपिंड दररोज सुमारे पन्नास गॅलन रक्त फिल्टर करतात आणि शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतात. किडन्यांमुळे शरीरात इलेक्ट्रोलाइट्सचं संतुलन राखणं आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास देखील मदत होते.
मूत्रपिंडाची ताकद वाढवण्याचे मार्ग -
मूत्रपिंड निरोगी ठेवण्यासाठी पुरेसं पाणी पिणं हा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय आहे. पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते आणि मूत्रपिंडांचं कार्य सुरळीतपणे करण्यास मदत करते. किडनी डिटॉक्स करण्यासाठी, पाण्यात काही नैसर्गिक गोष्टी मिसळून पिणं फायदेशीर ठरू शकतं.
- लिंबू पाणी: लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, यामुळे मूत्रपिंड स्वच्छ करण्यास मदत होते.
- क्रॅनबेरी ज्यूस: क्रॅनबेरी ज्यूसमुळे मूत्रमार्ग निरोगी ठेवता येतात आणि मूत्रपिंडांना संसर्गापासून वाचवण्यास मदत होते.
- ग्रीन टी: ग्रीन टीमधे असलेले अँटीऑक्सिडंट्स मूत्रपिंडांना डिटॉक्सिफाय करण्यास मदत करतात.
- जिरे पाणी: जिऱ्यामधे दाहक-विरोधी गुणधर्म असतात, ज्यामुळे पचन आणि मूत्रपिंड स्वच्छ करण्यास मदत करतात.
- आवळ्याचा रस: आवळ्यात व्हिटॅमिन सी आहे आणि मूत्रपिंड नैसर्गिकरित्या स्वच्छ करण्यासाठी याची मदत होते.
- डँडेलियन टी - पिवळ्या रंगाची फुलं येणारं हे रानटी फुलझाड आहे. या फुलांपासून बनवलेला चहा नैसर्गिक मूत्रवर्धक आहे, यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते.
मूत्रपिंडाची शक्ती वाढवण्याचे इतर मार्ग-
1. हर्बल चहा प्या.
डँडेलियन टी, ओवा आणि आलं यांसारख्या औषधी वनस्पती मूत्रपिंडांना विषमुक्त करण्यास मदत करतात. यापासून बनवलेला चहा प्यायल्यानं किडनीची कार्यक्षमता वाढते.
2. पोटॅशियमयुक्त फळं खा.
केळी, संत्री आणि किवी सारखी फळं मूत्रपिंड स्वच्छ करण्यास मदत करतात. यामुळे शरीरात इलेक्ट्रोलाइट्सचं संतुलन राखलं जातं आणि मूत्रपिंड निरोगी ठेवण्यासाठी मदत होते.
Asafoetida : छोटीशी डबी मोठी उपयोगी, हिंगाचे आरोग्यदायी फायदे वाचा
3. प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा.
जास्त मीठ आणि साखर असलेलं अन्न मूत्रपिंडांवर अतिरिक्त दबाव आणतं. म्हणून, ताज्या आणि नैसर्गिक पदार्थांना प्राधान्य द्या.
4. नियमित व्यायाम करा.
योगा आणि हलका व्यायाम केल्यानं रक्ताभिसरण सुधारतं आणि मूत्रपिंडाचे कार्य वाढतं.
5. हायड्रेटेड रहा.
पुरेसं पाणी प्यायल्यानं मूत्रपिंडांमधून विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत होते. तसंच, नारळ पाणी आणि लिंबू पाणी देखील फायदेशीर आहे. मूत्रपिंडाची ताकद वाढवण्याचा आणि ते विषमुक्त करण्याचा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणजे पुरेसे पाणी पिणं. याशिवाय, हर्बल टी, पोटॅशियमयुक्त फळं, निरोगी आहार आणि नियमित व्यायाम याद्वारेही मूत्रपिंड मजबूत केली जाऊ शकतात.
