देशाच्या अनेक भागात अजूनही कोरडं आणि गरम हवामान आहे. या हवेत नाकातून रक्त येण्याचे प्रकार अनेकदा दिसून येतात. उन्हाळ्यात, एपिस्टॅक्सिस म्हणजेच नाकातून रक्तस्त्राव होण्याचं प्रमाण लक्षणीयरीत्या वाढतं.
Climate Anxiety : बदलत्या ऋतूमधे तब्येतीला जपा, शरीराच्या संकेतांकडे दुर्लक्ष नको
आपल्या नाकात लहान रक्तवाहिन्या असतात, ज्या या ऋतूत अनेक वेळा फुटतात, ज्यामुळे नाकातून रक्तस्त्राव सुरू होतो. उन्हाळ्यात, कोरड्या हवेमुळे, नाकात अनेकदा ओलावा कमी होतो, ज्यामुळे नाकाच्या आतल्या रक्तवाहिन्या सुकतात आणि विस्तारतात. ज्यामुळे नाकातून रक्तस्त्राव सुरू होतो.
advertisement
नाकातून रक्त येत असेल तर काय करावं ?
- नाकातून रक्त येत असेल तर घाबरू नका, शांत राहा आणि रक्तस्त्राव थांबवण्याचा प्रयत्न करा.
- ज्या व्यक्तीच्या नाकातून रक्त येत असेल त्याला सरळ बसवा. नंतर नाक दाबून रक्तस्त्राव थांबवण्याचा प्रयत्न करा.
Heart Attack : Silent Killer हृदयविकाराची लक्षणं, महिलांनी जरुर लक्षात ठेवा या गोष्टी
- डोक्यावर थंड पाणी घाला.
- एका रुमालात बर्फ घ्या आणि तो नाकावर बाहेरच्या बाजूनं फिरवा.
- नाकातून रक्त येत असेल चेहऱ्यावर तसंच मानेवर Ice bag फिरवा.
- नाकातून रक्त येण्याचं प्रमाण अतिउष्ण भागात जास्त जाणवतं. विशेष करुन विदर्भासारख्या भागात जिथे उन्हाचा कहर असतो अशा ठिकाणी बाहेर जाताना टोपीच्या आत कांदा ठेवतात. पण यामागे ठोस वैद्यकीय कारण नाही.
- नेहमीचे सर्व उपाय करूनही रक्तस्त्राव थांबत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- नाक जोरात शिंकरायची सवय असेल तर बदला, अनेकदा उष्णतेमुळे नाही तर जोरात नाक शिंकरल्यामुळेही नाकातून रक्त येऊ शकतं.
कधीकधी रक्तदाब वाढल्यामुळेही नाकातून रक्त येऊ शकतं. उच्च रक्तदाबामुळे नाकात असलेल्या रक्तवाहिन्या फुटू शकतात आणि नाकातून रक्त येऊ शकतं. म्हणून, जर प्रथमोपचारानंतरही रक्तस्त्राव थांबला नाही तर ताबडतोब डॉक्टरांकडे जा.