Vitamin Deficiency : हात पाय सुन्न होत असतील तर वेळीच लक्ष द्या, जाणून घ्या कसा मिळेल आराम
मेण वितळतं तेव्हा मेणबत्तीचा वरचा भाग वितळतो आणि अधिक सुगंध बाहेर पडतो, ज्यामुळे हायड्रोकार्बन्स सारखी अस्थिर सेंद्रिय संयुगं बाहेर पडतात. एसीएसच्या 'एनव्हायर्नमेंटल सायन्स अँड टेक्नॉलॉजी लेटर्स'मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात या सुगंधाबाबतची माहिती देण्यात आली आहे.
advertisement
ही रसायनं हवेत असलेल्या इतर घटकांशी संयोग होऊन अगदी लहान कण तयार करू शकतात, ज्याचा श्वास घेतल्यास आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. शास्त्रज्ञांना हे आधीच माहित होते, परंतु मेण वितळवून असे कण तयार केले जाऊ शकतात की नाही हे आधीच्या संशोधनात स्पष्ट झालं नव्हतं. त्यामुळे अमेरिकेतील पर्ड्यू विद्यापीठातील संशोधकांनी ही प्रक्रिया समजून घेण्यासाठी एक प्रयोग केला. त्यांनी एका मॉडेल हाऊसमध्ये 15 वेगवेगळ्या प्रकारचं मेण वितळवण्याची चाचणी केली. प्रथम, त्यांनी घरातील वायू प्रदूषणाची पातळी मोजली, नंतर मेण वितळवलं यासाठी सुमारे 2 तास गरम लागले. यावेळी काही मीटर अंतरावरून हवेचे नमुने घेण्यात आले. संशोधकांना असं आढळून आलं की हवेमध्ये 1 ते 100 नॅनोमीटर आकाराचे खूप लहान कण आहेत, ज्याचे प्रमाण पारंपारिक मेणबत्त्या जळल्यामुळे तयार झालेल्या सारखेच होते.
Spices : चव आणि तब्येतीसाठी उपयुक्त - भारतीय मसाले, आरोग्यासाठी वरदान
शास्त्रज्ञांच्या मते, हे सूक्ष्म कण इतके लहान आहेत की ते श्वसन प्रणालीद्वारे रक्तप्रवाहात पोहोचू शकतात, ज्यामुळे आरोग्याचे धोके वाढू शकतात. मेण वितळण्यापासून उत्सर्जित होणाऱ्या प्रमुख व्हीओसीएसमध्ये टेरपेन्स नावाच्या पदार्थांचा समावेश होतो, जे ओझोनसह चिकट संयुगे तयार करतात असंही संशोधनात आढळून आलं.
ही संयुगं हवेत जमा होतात आणि नॅनो कणांमध्ये बदलतात. जेव्हा सुगंध नसलेले मेण वितळलं तेव्हा ना टर्पेन सोडले गेले ना कोणतेही नॅनोकण तयार झाले. या नॅनोकणांच्या निर्मितीत सुगंधी घटकांचं योगदान असतं हे या निरीक्षणावरून दिसून आलं. मेण वितळण्यापासून तयार झालेल्या नॅनोकणांचे आरोग्यावर होणारे परिणाम समजून घेण्यासाठी आणखी संशोधनाची गरज असल्याचं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.
