TRENDING:

उन्हाळ्यात माठातील पाणी प्यावं की फ्रीजमधील? शरिरावर कसा होतो परिणाम?

Last Updated:

उष्णतेचे चटके आता चांगलेच जाणवू लागले आहेत. त्यामुळे थंड पाणी घेत असताना ते फ्रिजमधील थंड पाणी असावे की? माठातील थंड पाणी असावे? याबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये मतमतांतरे असतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
advertisement

जालना : उष्णतेचे चटके आता चांगलेच जाणवू लागले आहेत. त्यामुळे प्रत्येकाचा थंड पाणी किंवा थंड पेय घेण्याकडे कल वाढला आहे. थंड पाणी घेत असताना ते फ्रिजमधील थंड पाणी असावे की? माठातील थंड पाणी असावे? याबाबत सर्वसामान्य नागरिकांमध्ये मतमतांतरे असतात. अतिशय थंड पाणी शरिराला हानिकारक ठरू शकते. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये तहान लागल्यानंतर माठातील नॉर्मल थंड पाणी पिणे शरिरासाठी उत्तम असते. उन्हाळ्यामध्ये माठातील पाणी प्यावे की? फ्रिजमधील? याबाबतचं आहार सल्लागार अमृता कुलकर्णी यांनी माहिती दिली आहे.

advertisement

उन्हाळा आता चांगलाच जाणवू लागला आहे. त्यामुळे अनेक जण तहान लागल्यानंतर अतिशय थंड म्हणजेच चिल्ड पाणी घेण्यास प्राधान्य देतात. परंतु फ्रीजमधील अत्यंत थंड पाणी आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. अतिशय थंड पाणी घेतल्याने आपली पचनशक्ती मंदावते. त्याचबरोबर आपल्याला पचनाचे विकार, ऍसिडिटी, मळमळ होऊ शकते. त्याचबरोबर खूप जास्त थंड पाणी पिल्याने घसा बसणे, नाक बसणे किंवा चोंदणे अशा पद्धतीचे त्रास होऊ शकतात, असं अमृता कुलकर्णी सांगतात.

advertisement

उन्हाळ्यात AC 24 तास सुरू ठेवा, 1 रुपया येणार नाही वीज बिल, सोप्पा फॉर्म्युला

अति थंड पाणी पिल्याने सर्दी, खोकला होणे, दातांची संवेदनशीलता वाढणे अशा गोष्टी देखील होऊ शकतात. त्याचबरोबर अति थंड पाणी पिल्याने आपली तहान लवकर भागते. यामुळे आपल्या शरीरात आवश्यकतेपेक्षा कमी पाणी जाते. याचाच परिणाम म्हणून आपली त्वचा रुक्ष होणे, ओठ किंवा त्वचा फाटणे अशा पद्धतीचे आजार देखील होऊ शकतात. यामुळे माठातील नॉर्मल थंड पाणी पिणे कधीही योग्य आहे, असं अमृता कुलकर्णी सांगतात.

advertisement

फ्रिजमधीलच पाणी प्यायचं असेल तर खूप जास्त चिल्ड पाणी न पिता नॉर्मल थंड पाणी प्यावं. त्याचबरोबर हे नेहमी न पिता एखादवेळी पिलेलं चांगलं. माठातील थंड पाणी हे अल्हाददायक थंड पाणी असल्याने आपण जास्त प्रमाणात पाणी पितो. त्यामुळे आपल्या शरिराला आवश्यक असणारे पाणी आपल्या शरिरामध्ये जाते आणि त्यामुळे उन्हाळ्यामुळे होणारे डीहायड्रेशन किंवा अन्य आजार टाळता येतात. त्यामुळे प्राधान्याने माठातीलच पाणी प्यावं, असंही अमृता कुलकर्णी यांनी सांगितलं.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
उन्हाळ्यात माठातील पाणी प्यावं की फ्रीजमधील? शरिरावर कसा होतो परिणाम?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल