झोपण्यापूर्वी चेहऱ्याला करा तेलानं मसाज
सर्वात आधी, चेहरा स्वच्छ आणि कोरडी करा. आता हातात पुरेसं तेल घ्या. त्यानंतर चेहऱ्याला हलक्या हातानं मसाज करा. त्यानंतर रात्रभर चेहऱ्यावर तेल लावून ठेवा आणि सकाळी कोमट पाण्यानं चेहरा स्वच्छ करा.
Skin Care: त्वचेची जळजळ होईल कमी, काळी वर्तुळं, सुरकुत्या होतील गायब, तुरटी करेल जादू
advertisement
केळी
सर्व प्रथम, एका भांड्यात एक चतुर्थांश केळं चांगलं कुस्करा, ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 15 ते 20 मिनिटं सोडा. यानंतर, आपला चेहरा कोमट पाण्यानं धुवा आणि कोरडं करा.
काकडीचा फेस मास्क
काकडी सोलून त्याचा रस काढा, नंतर कापसाच्या मदतीनं संपूर्ण चेहऱ्यावर लावा आणि 15 ते 20 मिनिटं राहू द्या. नंतर स्वच्छ पाण्यानं धुवा. यामुळे त्वचा स्वच्छ, चमकदार आणि घट्ट राहण्यास मदत होईल.
Potato Peels : बटाट्याच्या सालाचे फायदे ऐकून व्हाल थक्क, त्वचा, केसांसाठी उपयुक्त, असा करा वापर
कोरफड
कोरफड जेलनं चेहऱ्याला पूर्ण मसाज करा. 15-20 मिनिटं जेल चेहऱ्यावर राहू द्या. नंतर स्वच्छ पाण्यानं चेहरा स्वच्छ करा. यामुळे तुमच्या त्वचेचा घट्टपणा टिकून राहण्यासाठी मदत होईल.
हायड्रेशन
हायड्रेशन म्हणजेच पुरेसं पाणी पिणं. यामुळे त्वचा हायड्रेट ठेवण्यास मदत होते. पुरेसं पाणी प्यायल्यानं चेहऱ्याची सैल त्वचा घट्ट होते आणि ग्लोही कायम राहतो.
व्हिटॅमिन सी
व्हिटॅमिन सी हे एक पोषक तत्व आहे, जे त्वचेला चमकदार बनवण्यास मदत करते.
व्हिटॅमिन सी असलेला आहार घेतल्यानं चेहऱ्याची सैल त्वचा घट्ट होण्यास मदत होऊ शकते.