बीड : आरोग्यासाठी लाभदायक म्हणून मोसंबीला अनन्यसाधारण, असे महत्त्व प्राप्त झालेला आहे. आरोग्यासाठी उत्तम मानल्या जाणाऱ्या मोसंबी या फळाचा रस तुम्ही रोज सकाळी रिकाम्या पोटी सेवन केल्यास अति उत्तम मानले जाते. बद्धकोष्ठतेपासून आराम मिळण्यासही मोसंबी खूप मदत करते. पोटाच्या सर्व समस्यांपासून दूर ठेवण्यासाठी आणि आजारांपासून दूर ठेवण्यासाठी हे फळ अत्यंत उपयुक्त आहे. इतकेच नव्हे तर विषारी पदार्थ काढून टाकणे आणि तुम्हाला तंदुरुस्त ठेवते. त्यामुळे मोसंबीचे नेमके काय फायदे आहेत, शरीराला मोसंबी कशी फायदेशीर आहे, याचबाबत आपण आज जाणून घेऊयात. आरोग्य तज्ञ शेषेराव पवार यांनी लोकल18 शी बोलताना मोसंबीचे फायदे सांगितले.
advertisement
केसांसाठी मोसंबीचे फायदे -
केस गळणे आणि कमकुवत होण्याच्या समस्येने अनेकजण त्रस्त असतात. ज्यासाठी बाजारात उपलब्ध असलेली महागडी उत्पादने वापरली जातात, पण त्यांचा प्रभाव काही दिवसच राहतो. दुसरीकडे जर तुम्ही तुमच्या आहारात हंगामी फळांचा समावेश केला तर ते तुमच्या केसांची वाढ सुधारेल आणि केस गळणे थांबवेल. मोसंबी पचनसंस्थेला बळकट करते आणि त्यात आढळणारे पोषक घटक केसांना निरोगी बनवतात. वास्तविक कमकुवत पचनामुळे पुरेसे पोषण शरीरात आणि केसांच्या मुळांपर्यंत पोहोचत नाही. यामुळे केस गळण्यास सुरुवात होते. म्हणून केसांसाठी मोसंबी फायदेशीर आहे.
अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झालंय?, मग 72 तासांच्या आतच विमा कंपनीकडे करा तक्रार, VIDEO
वजन कमी करण्यास मोसंबी उपयुक्त -
मोसंबीमध्ये कॅलरी आणि फॅट कमी असते. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही तुमच्या आहारात मोसंबीचा रस समाविष्ट करू शकतात. यामुळे वजन कमी करण्यास मदत होऊ शकते.
बद्धकोष्ठतेपासून आराम देण्यासाठी मोसंबी प्रभावी -
मोसंबीचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेपासूनही आराम मिळतो. मोसंबीमध्ये ॲसिड आढळते, जे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते. यामध्ये असणारे फायबर पचनसंस्था निरोगी ठेवते.
सूचना - ही माहिती तज्ज्ञांशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. व्यक्तिगत सल्ला नाही. याबाबत लोकल18 कोणताही दावा करत नाही.