अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झालंय?, मग 72 तासांच्या आतच विमा कंपनीकडे करा तक्रार, VIDEO
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Abasaheb Dharmraj Sabale
Last Updated:
ज्या शेतकऱ्यांचा नुकसान झालंय त्यांनी 72 तासाच्या आत पूर्व सूचना द्यावी, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी दिली आहे.
उदय साबळे, प्रतिनिधी
धाराशिव : मागील 4 दिवसांपासून सातत्याने मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे काही ठिकाणी नद्यानाल्यांचं पाणी शेतात घुसले आहे तर पर्जन्यवृष्टीमुळे शेतात पाणीच पाणी साचले आहे. अशा संबंधित शेतकऱ्यांनी केवळ 72 तासात विमा कंपनीला पूर्व सूचना द्यावी, तरच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे. याबाबतची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी दिली.
advertisement
ऑगस्ट महिन्यातील जवळपास 3 आठवडे पावसाने उघडीप दिली होती. मात्र, मागील 4 दिवसात जोरदार पाऊस होत आहे. काही ठिकाणी अतिवृष्टीच्या नोंदी ही झाल्या आहे. त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी 72 तासांच्या आत पूर्वसूचना दिली तर ते शेतकरी संपूर्ण नुकसान भरपाईला पात्र ठरू शकणार आहेत.
एकट्या धाराशिव जिल्ह्यातून यावर्षी 7 लाख 19167 अर्जाद्वारे शेतकऱ्यांनी आपली खरीप पिके विमा संरक्षित केले आहेत. तर या पोटी कंपनीला शेतकरी राज्य व केंद्र शासनाच्या हिस्सापोटी615 कोटी रुपये मिळणार आहे.
advertisement
विमा कंपनीला तक्रार करण्यासाठी नेमकी काय कराल -
- विमा कंपनीला तक्रार करण्यासाठी तुम्ही विमा कंपनीच्या ॲपवरून पुर्वसुचना देऊ शकता.
- ई मेल वरून पूर्वसूचना देऊ शकता.
- कृषी विभागाकडे पूर्वसूचना देऊ शकता.
advertisement
ज्या शेतकऱ्यांचा नुकसान झालंय त्यांनी 72 तासाच्या आत पूर्व सूचना द्यावी, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी दिली आहे. त्यामुळे ज्यावेळेस अतिवृष्टीने तुमच्या पिकांचे नुकसान झालं असेल तर तुम्ही 72 तासाच्या आत विमा कंपनीला पूर्व सूचना देणे महत्त्वाचे आहे. तरच तुम्ही नुकसान भरपाई मिळवू शकता.
Location :
Osmanabad,Maharashtra
First Published :
August 28, 2024 1:58 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/धाराशिव/
अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झालंय?, मग 72 तासांच्या आतच विमा कंपनीकडे करा तक्रार, VIDEO