Vitamin Deficiency : दातांच्या आरोग्याकडे द्या लक्ष, कमकुवत दातांमागे असू शकतं हे कारण
बटाट्याच्या सालीचे फायदे
बटाट्याच्या सालीमध्ये पोटॅशियम, लोह आणि व्हिटॅमिन बी3 सारखे पोषक घटक असतात. त्याचबरोबर हे साल तुमच्या हृदयाच्या आरोग्याची विशेष काळजी घेतं. कारण त्यात उपस्थित पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियमचं प्रमाण असतं, यामुळे रक्तदाब नियंत्रत ठेवण्यास मदत होते. बटाट्याच्या सालांमुळे हाडं मजबूत होतात. हाडांची घनता वाढवण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो.
advertisement
Heart Care : हृदय निरोगी ठेवण्यासाठी लक्षात ठेवा या गोष्टी, जीवनशैलीतले बदल ठरतील उपयोगी
बटाट्याच्या सालीचे इतर फायदे
- बटाट्याच्या सालीपासून सेंद्रिय खत देखील बनवू शकता. कुंडीतल्या रोपांसाठीही याचा वापर करता येईल.
- बूट किंवा लेदर बॅग चमकण्यासाठी तुम्ही बटाट्याचं साल वापरू शकता.
- बटाट्याची सालं पाण्यात उकळून, गाळून ते पाणी केसांना लावल्यानं तुम्ही पांढरे केस काळे करू शकता. तुमच्या केसांसाठी नैसर्गिक हेअर डाय म्हणून याचा वापर करता येईल.
- बटाट्याच्या सालीमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट असतात, यामुळे त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त आहे. चेहरा आणि केसांसाठीच्या मास्कसाठी याचा वापर करु शकतो.
- बटाट्याच्या सालीमधलं रसायन असते, कीटकांना आकर्षित करतं, त्यामुळे याचा कीटकनाशक म्हणून ही वापर होऊ शकतो.
advertisement
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 27, 2025 6:23 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Potato Peels : बटाट्याच्या सालाचे फायदे ऐकून व्हाल थक्क, त्वचा, केसांसाठी उपयुक्त, असा करा वापर