Heart Care : हृदय निरोगी ठेवण्यासाठी लक्षात ठेवा या गोष्टी, जीवनशैलीतले बदल ठरतील उपयोगी
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी रोज चांगल्या सवयींचा अवलंब करणं गरजेचं आहे. जीवनशैलीतले काही बदल हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि हृदय वर्षानुवर्षे तरुण राहण्यासाठी महत्त्वाचे आहेत.
मुंबई : सोशल मीडियावर आपण अनेकदा हृदयविकाराचा झटका किंवा पक्षाघाताचा झटका आल्यानं झालेले परिणाम याविषयी वाचतो, याचे व्हिडिओ पाहून वाईटही वाटतं. असा प्रसंग टाळण्यासाठी हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. कारण हृदयाचं आरोग्य चांगलं राहिलं तर आपली प्रकृती चांगली राहते. जीवनशैलीतले काही महत्त्वाचे बदल यासाठी उपयुक्त ठरु शकतात.
निरोगी हृदयासाठी हे बदल नक्की करा -
- तुमच्या आहारात फायबरचा समावेश करा. तांदूळ, क्विनोआ, ओट्स आणि बार्ली यासारखे पदार्थ आपल्या आहारात असू द्या.
- फायबर व्यतिरिक्त, बी जीवनसत्त्व, मॅग्नेशियम आणि सेलेनियम सारख्या खनिजांच्या सेवनानं पचन सुधारतं आणि हृदयाला देखील फायदा होतो.
- फायबर रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी देखील प्रभावी आहे.
advertisement
advertisement
ऑलिव्ह ऑइल, सुका मेवा, हे चांगल्या फॅट्सचे चांगले स्रोत आहेत.
advertisement
- तळलेल्या पदार्थांना दूर ठेवा - ट्रान्स फॅट्स किंवा जास्त सॅच्युरेटेड फॅट्स हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले नाहीत. तळलेले पदार्थ आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये ट्रान्स फॅट्स आणि सॅच्युरेटेड फॅट्स असतात.
हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी ट्रान्स फॅट्सपासून दूर राहणं आवश्यक आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 26, 2025 5:45 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Heart Care : हृदय निरोगी ठेवण्यासाठी लक्षात ठेवा या गोष्टी, जीवनशैलीतले बदल ठरतील उपयोगी