Soaked Raisins : सकाळी रिकाम्या पोटी प्या भिजवलेल्या बेदाण्यांचं पाणी, प्रकृतीसाठी भरपूर फायदेशीर

Last Updated:

सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेल्या बेदाण्याचं पाणी पिणं आरोग्यासाठी फायदेशीर आहे. लोह आणि अनेक जीवनसत्व असल्यानं प्रकृतीला आवश्यक लोहही मिळतं आणि प्रतिकारशक्ती वाढते. 

News18
News18
मुंबई : दिवसाची सुरुवात अनेक जण गरम किंवा कोमट पाणी पिऊन करतात. काही जण सुका मेवा खाऊन दिवसाची सुरुवात करतात. सुकामेवा नुसता खाल्ला जातो पण भिजवून खाण्याचेही आरोग्याला अनेक फायदे आहेत. मनुका किंवा बेदाण्यांमध्ये भरपूर पोषक घटक आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात. 4 ते 5 बेदाणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी खायचे.
भिजवलेले बेदाणे खाण्याचे फायदे -
शरीरात विषारी पदार्थ असल्यानं अनेकांना आरोग्याच्या तक्रारी जाणवतात. या टॉक्सिन्सचा परिणाम अंतर्बाह्य जाणवतो. अशा परिस्थितीत मनुका शरीराला डिटॉक्स करण्यासाठी उपयुक्त ठरतात.
रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असेल तर ती व्यक्ती आजारांना लवकर बळी पडते.अशा वेळी खोकला,सर्दी लगेच होते. ओले बेदाणे खाल्ल्यानं, आणि त्याचं पाणी प्यायल्यानं शरीराला व्हिटॅमिन सी आणि बी कॉम्प्लेक्सचा पुरवठा होतो. ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि शरीर संक्रमणांशी अधिक चांगल्या प्रकारे लढू शकते.
advertisement
बेदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात लोह असते. ओले मनुके किंवा बेदाणे खाल्ल्यानं शरीराला भरपूर लोह मिळतं. यामुळे लाल रक्तपेशी वाढतात आणि अशक्तपणा दूर होतो.त्यामुळे ज्यांना लोहाची कमतरता आणि अशक्तपणाचा जाणवतो त्यांना ओल्या मनुका किंवा बेदाणे खाण्याचा सल्ला दिला जातो.
त्वचेच्या समस्येवरही ओले मनुके गुणकारी ठरतात. भिजवलेल्या मनुकामधील अँटी-ऑक्सिडंट्स त्वचेचं नुकसान होण्यापासून वाचवतात. बेदाण्यांमध्ये व्हिटॅमिन ए आणि ई देखील असतात. हे दोन्ही घटक त्वचेच्या आरोग्यासाठी चांगले असतात. ओले मनुके वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करण्यासाठी देखील प्रभावी आहेत. त्वचा सुधारण्यासाठी मनुका खाऊ शकता.
advertisement
ओले मनुके / बेदाणे खाण्याचे इतर फायदे
हाडं मजबूत करण्यासाठी भिजवलेल्या मनुका खाऊ शकता. मनुका हाडांना कॅल्शियम पुरवतात.
मनुक्यांमध्ये फायबर आणि पोटॅशियमचं प्रमाण चांगलं असल्यानं रक्तदाब कमी होतो.
बेदाणे / मनुका खाल्ल्यानं हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं.
advertisement
मनुका किंवा बेदाण्यांमुळे पचनक्रिया व्यवस्थित राहते. यामध्ये असलेलं फायबर पचनसंस्थेसाठी चांगलं असतं.
बद्धकोष्ठतेच्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी ओले मनुके खाऊ शकता. बेदाणे किंवा मनुका आतड्यांच्या विकारांनाही रोखण्यासाठी उपयुक्त आहेत.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Soaked Raisins : सकाळी रिकाम्या पोटी प्या भिजवलेल्या बेदाण्यांचं पाणी, प्रकृतीसाठी भरपूर फायदेशीर
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement