Proteins : प्रथिनांसाठी फक्त अंडी हाच पर्याय नाही, हे शाकाहारी पदार्थही लक्षात ठेवा
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
शरीरात प्रथिनांची कमतरता भरुन काढण्यासाठी, अंडी किंवा मांस खाण्याचा सल्ला देतात. पण शाकाहारींसाठी कोणते पदार्थ उपयोगी पडतील, कोणत्या शाकाहारी पदार्थात किती प्रथिनं आहेत हे लक्षात घेऊन तुम्ही त्याप्रमाणे आहारात बदल करू शकता.
मुंबई : मांसाहारी असाल आणि आहारात प्रथिनांचा समावेश करायचा असेल तर जास्त विचार करावा लागत नाही, पण शाकाहारी असाल तर प्रथिनांसाठी डाळींव्यतिरिक्त काय खायचं असा प्रश्न येत असेल तर ही माहिती तुमच्यासाठी.
प्रथिनांची कमतरता पूर्ण करण्यासाठी फक्त अंडीच खायला हवी असं नाही, शाकाहारी पदार्थांमध्येही भरपूर प्रथिनं असतात हे लक्षात घेणं आवश्यक आहे. प्रत्येकाच्या शरीराला किती प्रथिनांची आवश्यकता आहे हे व्यक्तीचं वय, लिंग आणि शारीरिक हालचालींवर अवलंबून असतं. शरीरात प्रथिनांची कमतरता भरुन काढण्यासाठी, अंडी किंवा मांस खाण्याचा सल्ला देतात. यासाठी शाकाहारी पदार्थांची एक यादी लक्षात ठेवा जेणेकरुन, कोणत्या शाकाहारी पदार्थात प्रथिनं आहेत, ज्याचा तुम्ही तुमच्या आहारात समावेश करू शकता.
advertisement
सोयाबीन
सोयाबीन हा वनस्पती- उत्पादित प्रथिनांचा स्त्रोत आहे, ज्यात 100 ग्रॅममध्ये सुमारे 29 ग्रॅम प्रथिनं मिळू शकतात.
मटार
100 ग्रॅम मटारमध्ये सुमारे 9 ग्रॅम प्रथिनं असतात. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी, मटारमध्ये मुबलक प्रमाणात मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात.
advertisement
हरभरा
हरभरा डाळीमध्ये 100 ग्रॅममध्ये सुमारे 19 ग्रॅम प्रथिनं असतात. स्नायूंना बळकट करण्यासाठी हरभरा उपयुक्त आहे.
शेंगदाणा
शेंगदाण्यात प्रति 100 ग्रॅम सुमारे 20 ग्रॅम प्रथिनं असतात. यामुळे तुमच्या शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो.
बदाम
100 ग्रॅम बदामात सुमारे 21 ग्रॅम प्रथिनं असतात. त्वचेसाठी आणि केसांसाठी हा प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. यामुळे चेहरा आणि केसांची चमक कायम राहते.
advertisement
टोफू
टोफू हे सोया उत्पादनाचा एक प्रकार आहे, ज्यामध्ये 100 ग्रॅममध्ये सुमारे 20 ग्रॅम प्रथिनं असतात.
राजमा
राजमा डाळीमध्ये 100 ग्रॅममध्ये तुमच्या शरीराला सुमारे 22 ग्रॅम प्रथिनं मिळू शकतात.
कडधान्यं - वनस्पती-आधारित या प्रथिनांमध्ये 100 ग्रॅम कडधान्यात अंदाजे 25 ग्रॅम प्रथिनं असतात.
advertisement
सुका मेवा - 30 ग्रॅम अक्रोडमध्ये 4 ग्रॅम प्रथिनं आणि 30 ग्रॅम हेझलनटमध्ये 4 ग्रॅम प्रथिनं मिळू शकतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 25, 2025 6:28 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Proteins : प्रथिनांसाठी फक्त अंडी हाच पर्याय नाही, हे शाकाहारी पदार्थही लक्षात ठेवा