Alor Vera : उन्हाळ्यात घ्या चेहऱ्याची काळजी, कोरफडीचा गर करेल त्वचेचं संरक्षण

Last Updated:

उन्हाळ्यात चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी, कोरफडीचा गर खूप उपयुक्त आहे. जेल विकतही मिळतं पण तुम्ही घरी कोरफडीचा जेल घरी बनवू शकता.

News18
News18
मुंबई : उन्हाळा सुरु झालाय, आणि उन्हाच्या झळांचा कोरडा वाराही सुरु झालाय. याचा पहिला परिणाम जाणवतो तो तब्येतीवर आणि चेहऱ्यावर. उन्हाळ्यात चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी, कोरफडीचा गर खूप उपयुक्त आहे. जेल विकतही मिळतं पण तुम्ही घरी कोरफडीचा जेल घरी बनवू शकता. हा गर घरी कसा साठवून ठेवायचा पाहूया.
कोरफडीचा गर साठवण्यासाठी आणि त्याचा ताजेपणा टिकून राहण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स. कोरफड
जेलचे त्वचेला अनेक फायदे आहेत. त्वचा आणि केसांसाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. कोरफडीत दाहक गुणधर्म भरपूर असतात. हा गर चेहऱ्यावर लावल्यानं त्वचेला पुरेशी आर्द्रता मिळते, सनबर्नची समस्या कमी करता येते, आणि त्वचेला थंडावा मिळतो. मुरुमांचं प्रमाण कमी करण्यासाठीही कोरफड फायदेशीर आहे. केसांवर कोरफड लावल्यास टाळूला पुरेसा ओलावा मिळतो, केस मऊ होतात आणि कोंडा कमी होण्यासही मदत होते.
advertisement
अनेकांच्या घरात कोरफड लावलेली असते. पण, या पानांमधून गर काढला तर ते एक ते दीड दिवसांत खराब होतो आणि कोरफड वाया जाते.
कोरफडीचा गर साठवण्यासाठी काही टिप्स -
कोरफडीचा गर साठवण्याची पहिली अट म्हणजे गर थंड ठिकाणी ठेवावा. कोरफड फ्रिजमध्ये ठेवल्यास ते जास्त काळ खराब होणार नाही आणि किमान आठवडाभर वापरण्यासाठी योग्य राहील.
advertisement
कोरफड वेरा जेल साठवण्यासाठी हवाबंद कंटेनर वापरा.
स्क्रू असलेला जार वापरल्यानं बाहेरची हवा आत जाणार नाही.
कोरफड गर ठेवलेली बाटली किंवा जार सूर्यप्रकाशापासून दूर ठेवा. कोरफड गर ज्या बाटली किंवा जारमध्ये भरणार तेव्हा ते आधी पूर्णपणे स्वच्छ करा. कोरफडीचं पान कापून बर्फाच्या पाण्यात ठेवा.
जेल न बनवता हा लगदा पानातून जसा आहे तसा बाहेर काढता येतो आणि कधीही वापरता येतो.
advertisement
घरच्या घरी कोरफड जेल कसं बनवावं ?
कोरफडीचं जेल बनवण्यासाठी कोरफडीचं ताजं पान कापून घ्या.
पानाचा हिरवा भाग कापून पांढरा जेल वेगळा करा.
हा पांढरा लगदा मिक्सरमध्ये टाकून एकदा फिरवा.
त्यात थोडं गुलाबपाणी मिसळा आणि डब्यात ठेवा. घरगुती कोरफडीचं जेल तयार आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Alor Vera : उन्हाळ्यात घ्या चेहऱ्याची काळजी, कोरफडीचा गर करेल त्वचेचं संरक्षण
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement