हळदीचा फेस पॅक अनेकजण वापरतात. पण हळदीचा फेसपॅक आणखी 5 वेगवेगळ्या गोष्टींनी तयार केला जाऊ शकतो. ज्यामुळे तुमच्या त्वचेच्या समस्या दूर होऊ शकतात. त्यामुळे पोटात जाण्याबरोबरच चेहऱ्यावरही हळद हा मसाला लावता येतो. यामध्ये आढळणारी पोषक तत्त्वांमुळे तुमचा चेहरा आणखी सुंदर दिसेल.
यामुळे तुमची त्वचा चांगली होईल आणि मुरुमांचे डागदेखील कमी होऊ शकतात. पाहूयात, हळदीमध्ये 5 वेगवेगळ्या गोष्टी मिसळून फेस पॅक कसा बनवायचा याविषयीची माहिती. यामुळे तुमच्या त्वचेशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात.
advertisement
हळद आणि दुधाचा पॅक - हे बनवण्यासाठी तुम्हाला 1 चमचा हळद आणि 2 ते 3 चमचे दूध लागेल.
तयार करण्याची पद्धत : दुधात हळद चांगली मिसळा. आता पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 15-20 मिनिटं राहू द्या.
यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा. नंतर कोरडा करा आणि चांगलं मॉइश्चरायझर लावा.
हळद आणि मधाचा पॅक - हे बनवण्यासाठी तुम्हाला 1 चमचा हळद आणि 1 चमचा मध लागेल.
तयार करण्याची पद्धत - हळद आणि मध चांगलं मिसळा, नंतर चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटं राहू द्या.
त्यानंतर कोमट पाण्यानं चेहरा धुवून स्वच्छ करा.
हळद आणि बेसन पॅक - हे बनवण्यासाठी 1 चमचा हळद, 2-3 चमचे बेसन आणि पाणी किंवा गुलाबजल
आवश्यक आहे.
तयार करण्याची पद्धत - एका भांड्यात हळद आणि बेसन एकत्र करा. नंतर पाणी किंवा गुलाबपाणी घालून घट्ट पेस्ट तयार करा. त्यानंतर ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 15-20 मिनिटं राहू द्या. पॅक सुकल्यावर हलक्या हातानं घासून स्वच्छ करा.
Post Diwali Diet Tips : दिवाळीच्या सुट्टीत वजन वाढलं, या पेयांनी करा वजन कमी..
हळद आणि लिंबाचा पॅक - हे बनवण्यासाठी तुम्हाला 1 चमचा हळद आणि 1 चमचा लिंबाचा रस लागेल.
तयार करण्याची पद्धत - हळद आणि लिंबाचा रस मिसळून पेस्ट तयार करा. आता हे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि 10-15 मिनिटं राहू द्या. त्यानंतर पाण्यानं चेहरा धुवा.
हळद आणि बटाटा पॅक - 1 चमचा हळद आणि 2 चमचे बटाट्याचा रस आवश्यक आहे.
तयार करण्याची पद्धत: हळद आणि बटाट्याचा रस एकत्र करून पेस्ट तयार करा. त्यानंतर ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 15-20 मिनिटं राहू द्या यानंतर चेहरा धुवा.