Health : ब्रेन स्ट्रोकपासून वाचवण्यासाठी 'या' गोष्टी करणं अत्यंत महत्त्वाचं; निरोगी मेंदूसाठी डाॅक्टरांनी सांगितले उपाय

Last Updated:

नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, साखर नियंत्रणात ठेवा. आरोग्यपूर्ण आहार घ्या आणि नियमित व्यायाम करा. महिलांनी गर्भधारणा, गर्भनिरोधक आणि रजोनिवृत्तीच्या काळात विशेष काळजी घ्या. या सर्व उपाययोजनांद्वारे स्ट्रोकचा धोका कमी करता येतो.

News18
News18
दरवर्षी लाखो लोक ब्रेन स्ट्रोकचा त्रास सहन करतात. त्यांच्यासाठी चांगली बातमी अशी आहे की, यातील ब्रेन स्ट्रोक्समधील अनेक स्ट्रोक टाळता येऊ शकतात. अमेरिकन हार्ट असोसिएशन (AHA) आणि अमेरिकन स्ट्रोक असोसिएशन (ASA) यांनी नव्या मार्गदर्शक तत्वांमध्ये जीवनशैलीत बदल करून आणि काही उपाययोजनांच्या माध्यमातून स्ट्रोकचा धोका कमी करण्याचे मार्ग सांगितले आहेत.
स्ट्रोकचा धोका ओळखण्यासाठी आरोग्य तपासणी : या नवीन मार्गदर्शक तत्वांमध्ये रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, रक्तातील साखर आणि लठ्ठपणा यांसारख्या स्ट्रोकच्या धोके घटकांची नियमित तपासणी करण्याचे महत्त्व सांगण्यात आले आहे. डॉक्टरांनी या समस्या लवकर ओळखून त्यांचे नियमित नियंत्रण करावे. विशेषतः ज्यांचा रक्तदाब किंवा कोलेस्ट्रॉल जास्त आहे, त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने एक योग्य योजना तयार करून धोका कमी करू शकतात.
advertisement
आरोग्यपूर्ण आहाराचा अवलंब करा : या मार्गदर्शक तत्वांमध्ये आरोग्यपूर्ण आहाराचा उल्लेख आहे, ज्यात ताजे फळे, भाज्या, संपूर्ण धान्य आणि ऑलिव्ह तेलासारख्या आरोग्यदायी चरबींचा समावेश असतो. हा आहार हृदयविकाराच्या जोखमीला कमी करून ब्रेन स्ट्रोकचा धोका कमी करण्यास मदत करतो. याशिवाय, लाल मांस, साखरेचे पदार्थ आणि प्रक्रियायुक्त स्नॅक्स कमी करण्याची शिफारस केली आहे.
advertisement
नियमित शारीरिक हालचाल महत्वाची : शारीरिक निष्क्रियता हा स्ट्रोकचा एक मोठा कारण आहे आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी दर आठवड्याला किमान 150 मिनिटे मध्यम तीव्रतेचा व्यायाम किंवा 75 मिनिटे उच्च तीव्रतेचा व्यायाम करण्याची शिफारस केली आहे. दररोज पायऱ्या चढणे किंवा चालणे यासारख्या साध्या गोष्टींमुळे देखील स्ट्रोकचा धोका कमी होऊ शकतो.
महिलांसाठी विशेष सूचना : प्रेगन्सी, ओरल कॉन्ट्रासेप्टिव आणि मेनोपॉज यांसारख्या विशिष्ट जोखमींवर लक्ष ठेवावे. अंडोत्सर्जन समस्यांचा त्रास असणाऱ्या किंवा लवकर मेनोपॉज आलेल्या महिलांनी याबद्दल डॉक्टरांशी चर्चा करावी. या नव्या मार्गदर्शक तत्वांमुळे स्ट्रोक टाळण्यासाठी आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी योग्य दिशा मिळू शकते.
advertisement
(टीप : संबंधित बातमी केवळ जनजागृतीसाठी लिहिली आहे. आम्ही ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी वापरली आहे. तुमच्या आरोग्याबाबत डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या.)
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health : ब्रेन स्ट्रोकपासून वाचवण्यासाठी 'या' गोष्टी करणं अत्यंत महत्त्वाचं; निरोगी मेंदूसाठी डाॅक्टरांनी सांगितले उपाय
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement