छत्रपती संभाजीनगर : सध्या अनेकजणांना मधुमेहाचा आजार होत असल्याचे दिसून येत आहे. पूर्वी मधुमेह हा ज्येष्ठ लोकांना व्हायचा. मात्र, आता याचे प्रमाण हे महिला, तरुण, पुरुषांमध्येही दिसून येत आहे. वयाच्या 40 मध्ये किंवा त्यापेक्षा पण अगदी लहान वयामध्ये मधुमेहाचा आजार हा सर्वांना गाठत आहे. टाईप टू मधुमेहाचा विचार केला असता महिलांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे अशा महिलांनी स्वतःची कशी काळजी घ्यावी, काय आहार घ्यावा, याविषयी आज आपण जाणून घेऊयात.
advertisement
छत्रपती संभाजीनगरमधील मधुमेह तज्ञ डॉ. मयुरा काळे यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, ज्या महिलांना टाईप टू मधुमेह आहे अशा महिलांनी आपली स्वतःची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. विशेष म्हणजे आपली बदललेली जीवनशैली यामुळे हा टाईप टू मधुमेह होण्याचे प्रमाण वाढले आहे.
सध्या महिला मोठ्या प्रमाणामध्ये मोबाईलचा वापर करतात. त्याचबरोबर मैदायुक्त जास्त पदार्थ खातात. तसेच मानसिक तणावही असतो. या सगळ्या गोष्टींमुळे हा टाईप टू मधुमेहाचे प्रमाण महिलांमध्ये वाढले आहे. ज्या महिलांना टाईप टू मधुमेह आहे, अशा महिलांनी आपल्या जीवनामध्ये अनेक बदल करणे गरजेचे आहे.
पारंपरिक शेतीतून मनासारखं उत्पन्न मिळत नव्हतं, नर्सरीचा मार्ग निवडला, आज लाखो रुपयांची कमाई
सर्वप्रथम तर आपण कुठलाही ताण घेऊ नये. वेळेवर आहार घ्यायला हवा. त्याचबरोबर मैदायुक्त पदार्थांचा वापर आपल्या आहारामध्ये नसावा. आहारामध्ये पालेभाज्या, फळभाज्या, फळांचा आणि कडधान्यांचा समावेश करावा. त्यासोबतच व्यायाम करावा.
तुम्ही जिमलाही जाऊ शकता किंवा तुम्ही दररोज मॉर्निंग वॉकदेखील करू शकता. विशेष म्हणजे ताण घेतल्याने मधुमेहाचे प्रमाण जास्त वाढत आहे. त्यामुळे महिलांनी कुठलाही ताण न घेता आपले जीवन जगावे. यामुळे तुम्हाला हा त्रास होणार नाही. जर महिलांनी ही काळजी घेतली तर त्यांना मधुमेह होणार नाही किंवा ज्यांना मधुमेह आहे, त्यांनी मधुमेह नियंत्रणात राहील, असे मधुमेहतज्ञ डॉ. मयुरा काळे यांनी सांगितले.