पारंपरिक शेतीतून मनासारखं उत्पन्न मिळत नव्हतं, नर्सरीचा मार्ग निवडला, आज लाखो रुपयांची कमाई

Last Updated:

beed nursery business success story - रामकिसन कोरडे असे बीड येथील या नर्सरी व्यावसायिकाचे नाव आहे. ते शेतीसाठी आवश्यक असणारी पालेभाज्यांची छोटी रोपे यांची विक्री करतात. या माध्यमातून त्यांना अगदी चांगला नफा मिळत असून हा व्यवसाय रामकिसन कोरडे यांच्यासाठी फायदेशीर ठरला आहे.

+
बीड

बीड शेतकरी सक्सेस स्टोरी

प्रशांत पवार, प्रतिनिधी
बीड - नर्सरी हा व्यवसाय अनेकांसाठी फायदेशीर ठरत असल्याने या व्यवसायात प्रचंड क्रेझ वाढत असल्याचे दिसून येत आहे. अगदी कमीत कमी क्षेत्रात तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता आणि या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळू शकता. आज अशाच एका शेतकऱ्याची कहाणी आपण जाणून घेणार आहोत, ज्यांनी या व्यवसायाच्या माध्यमातून लाखो रुपयांची कमाई केली आहे.
advertisement
रामकिसन कोरडे असे बीड येथील या नर्सरी व्यावसायिकाचे नाव आहे. ते शेतीसाठी आवश्यक असणारी पालेभाज्यांची छोटी रोपे यांची विक्री करतात. या माध्यमातून त्यांना अगदी चांगला नफा मिळत असून हा व्यवसाय रामकिसन कोरडे यांच्यासाठी फायदेशीर ठरला आहे.
अगदी 30 गुंठ्यांमध्ये रामकिसन कोरडे यांनी हा व्यवसाय चालू केला आहे. सुरुवातीला हा व्यवसाय सुरू करताना त्यांना घरच्यांचेही पाठबळ मिळाले. या नर्सरीच्या माध्यमातून ते 10 प्रकारच्या रोपांची विक्री करतात. यामध्ये टोमॅटो, वांगी, मिरची, गवार, शिमला मिरची, शेवगा, चवळी, ककडी दोडका आणि कढीपत्ता यांचा समावेश आहे.
advertisement
हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी रामकिसन कोरडे हे पारंपारिक शेती करत असत. मात्र, त्यातून त्यांना फारसे काही उत्पन्न मिळत नव्हते. म्हणून ते नर्सरी व्यवसायाकडे वळले. सुरुवातीला त्यांनी अगदी छोटीशी सुरुवात केली. मात्र, आज ती सुरुवात एका वेगळ्या उंचीवर येऊन पोहोचलेली आहे.
advertisement
रामकिसन कोरडे हे नर्सरी या व्यवसायाच्या माध्यमातून कमीत कमी वर्षाला 5 ते 6 लाख एवढा नफा मिळवत आहेत. शेतकरी पारंपारिक पिकासोबतच इतर काहीतरी करता यावा, म्हणून अनेक वेळा प्रयत्नशील असतात. यामध्ये रोपवाटिका म्हणजे नर्सरी या व्यवसायाने शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये भर पाडली आहे, हे रामकिसन कोरडे यांच्या कहाणीवरुन सिद्ध झाले आहे.
मराठी बातम्या/कृषी/
पारंपरिक शेतीतून मनासारखं उत्पन्न मिळत नव्हतं, नर्सरीचा मार्ग निवडला, आज लाखो रुपयांची कमाई
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement