मांजर आडवी जाणं चांगलं की वाईट, काय आहे यामागची नेमकी खरी माहिती

Last Updated:

Beliefs or superstitions : काळी मांजर रस्त्यात आडवी गेली तर तो अपशकुन समजला जातो. आपले काम होणार नाही, असे अनेकांना वाटते. या सर्व बाबी खऱ्या आहेत का, यामागची उत्तरे नेमकी काय आहेत, हेच आपण आज जाणून घेणार आहोत.

+
प्रतिकात्मक

प्रतिकात्मक फोटो

कुणाल दंडगव्हाळ, प्रतिनिधी
नाशिक - जगात आजही अनेकांच्या मनात विविध बाबींबद्दल श्रद्धा आहे. तर अनेकजण अंधश्रद्धांनाही बळी पळताना दिसतात. अनेक जण आजही विविध गोष्टी पाळताना दिसतात. त्यातच ‘मांजर’ ही चांगली असते की वाईट असते, अनेकांना प्रश्न पडतो. ती जर आपल्या घरात आली अथवा आपण तिला पाळले तर त्यामागे नेमके काय संकेत असतात, याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम असतात. काळी मांजर रस्त्यात आडवी गेली तर तो अपशकुन समजला जातो. आपले काम होणार नाही, असे अनेकांना वाटते. या सर्व बाबी खऱ्या आहेत का, यामागची उत्तरे नेमकी काय आहेत, हेच आपण आज जाणून घेणार आहोत.
advertisement
नाशिक येथील प्रसिद्ध महंत अनिकेत शास्त्री यांनी याबाबत महत्त्वाची माहिती सांगितली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, मांजरीलाही देवानेच या पृथ्वीवर जन्म दिला आहे. त्यातच आत्मा म्हणजेच परमात्मा असतो. आपल्याला हे माहिती असून आपण जुन्या प्रथेप्रमाणे काही वेगवेगळा अर्थ लावत असतो. यात कुणाचीही आस्था दुखावणार नाही, असे उत्तर देखील आहे. शेवटी ज्याच्या त्याच्या श्रद्धेचे हे प्रश्न असणार आहेत.
advertisement
मांजर हा प्राणी नकारात्मक ऊर्जा आपल्या अंगी घेऊन तिला नष्ट करणारा एकमेव प्राणी आहे. त्यातच मांजर हा प्राणी आक्रमक देखील असल्याने पूर्वीपासून याला थोडा लांबच ठेवण्यात आलेला आहे. महत्त्वाचे म्हणजे एका रंगाची मांजर ही जास्त प्रमाणात असते. जसे काळा रंग हे वैज्ञानिक संशोधनातून स्पष्ट झालेले आहे.
advertisement
पूर्वीचे लोक हे अशिक्षित असल्याने पाप पुण्याच्या भाषेतून लवकर समज येण्यासाठी अशा गोष्टी सांगाव्या लागत असत. लहानपणापासून वडीलधारी व्यक्ती आपल्याला मांजर आडवी गेली की पुढे नको जाऊ, आपले काम होणार नाही किंवा माघारी ये असल्या गोष्टी सांगायचे. या मागेही शास्त्रीय आणि वैज्ञानिक करणे आहेत.
advertisement
मांजर हा हिंसक प्राणी असल्याने भक्षक म्हणून ती उंदराना खाते. तर मेलेला उंदीर हा किटक अंगातुन सोडत असतो. काही काळानंतर तो प्लेग हा किटाणू मोठ्या प्रमाणातून आपल्या अंगातून सोडतो. मांजर ही उंदीर आपल्या तोंडातून रास्ता ओलांडत असताना तिच्या लाळेच्या माध्यमातून हे जंतू रस्त्यात पडत जातात. तो रोग आपण जात असताना आपल्याला होऊ नये, यासाठी अशा भाषेत पूर्वीच्या पिढीला सांगितले जात होते. कारण त्यावेळी वैज्ञानिक भाषा ही लोकांना समजून घ्यायची नव्हती, असेही ते म्हणाले.
advertisement
यामुळेही अशा स्वरुपात हे आजदेखील चालत आले शब्द आहेत. मात्र, आताची तरुण पिढी यावर विश्वास ठेवत नाही. तरी याला एक वैज्ञानिक कारण असल्याचे लक्षात घेणे गरजेचे आहे, असे अनिकेत शास्त्री यांनी लोकल18 सोबत बोलताना सांगितले.
सूचना - ही माहिती पंडित यांच्याशी साधलेल्या संवादावर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही. 
मराठी बातम्या/अध्यात्म/
मांजर आडवी जाणं चांगलं की वाईट, काय आहे यामागची नेमकी खरी माहिती
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement