आवळा, नारळ, काकडी, लिंबाचा रस तुमच्या केसांच्या वाढीसाठी रामबाण घरगुती उपाय ठरु शकतो.
Coconut, Camphor : नारळ आणि कापूर - त्वचा, केसांसाठी उपयुक्त, सांधेदुखी-सूज होते कमी
आवळा
केसांची काळजी घेणाऱ्या सुपरफूडचा विचार केला तर आवळ्याचा नंबर सर्वात आधी येतो. कारण त्यात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट असतात, ज्यामुळे केस मजबूत आणि लांब होतात. त्याचबरोबर आवळ्याच्या रसामुळे केसगळती कमी होते आणि मुळांमध्ये रक्ताभिसरण वाढतं.
advertisement
काकडी
काकडीचा रसही केसांच्या लांबीसाठी उपयुक्त आहे. केस धुण्यापूर्वी काकडीचा रस टाळूवर लावा. केस जाड आणि लांब होण्यासाठी काकडीचा उपयोग होतो.
High BP : हाय बीपीची औषधं घेण्याचा कंटाळा येत असेल तर हे 8 घरगुती उपाय करा, रक्तदाब राहील नियंत्रणात
लिंबू
लिंबाचा रस देखील तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी खूप चांगला आहे. याच्या मसाजमुळे केसांच्या मुळांमध्ये रक्ताभिसरण वाढतं. त्यामुळे केस गळणं थांबतं आणि वाढ चांगली होते.
फणस
केसांच्या वाढीसाठी फणसाचा रस देखील चांगला आहे. फणसाचा रस काढून केसांच्या मुळांवर लावा आणि वीस ते तीस मिनिटं राहू द्या. नंतर केस चांगले धुवा.
पपई
पपईही तुमच्या केसांसाठीही रामबाण उपाय आहे. त्याचा रस मुळांवर लावल्यास केसांची वाढ चांगली होते आणि केस काळे, दाट होतात.
या सगळ्या बरोबरच तुमचा आहार कसा आहे यावर केसांचं पोषण अवलंबून आहे त्यामुळे आहाराकडेही लक्ष द्या.