रक्तदाब अचानक 90/60 मिमीएचजी किंवा त्यापेक्षा कमी झाला तर सर्वप्रथम घाबरू नका. काही सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करून परिस्थिती हाताळू शकता. डॉ. झैदी यांनी एका व्हिडिओद्वारे, कमी रक्तदाब ताबडतोब नियंत्रित करण्यासाठी प्रभावी ठरणारे तीन अतिशय सोपे मार्ग सांगितले आहेत.
Digestion : दही - त्रिफळा मिश्रण - पचनसंस्था चांगली ठेवण्यासाठी पारंपरिक उपाय
advertisement
रक्तदाब कमी झाला असेल तर या गोष्टी करा -
1. मीठ-साखर पाणी
रक्तदाब कमी असेल तर डॉ. झैदी यांनी दिलेला सर्वात पहिला सल्ला म्हणजे, मीठ-साखर पाणी प्या. यासाठी एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा मीठ आणि एक चमचा साखर घाला आणि ते चांगलं ढवळून घ्या. हे पाणी प्यायल्यानं शरीरातील द्रवपदार्थांचं संतुलन सुरळीत होण्यास मदत होते, ज्यामुळे रक्तदाब लगेच वाढतो.
2. पाय उंच करा
कमी रक्तदाबामुळे चक्कर येत असेल किंवा अशक्त वाटत असेल तर सरळ झोपा आणि पाय हृदय गतीपेक्षा वर करा. डॉक्टरांच्या मते, ही स्थिती मेंदू आणि हृदयात रक्त जलद पोहोचवण्यास मदत करते, ज्यामुळे रक्तदाब स्थिर होतो.
Foods for Sleep : झोपेचं गणित जमलं तर तब्येत राहिल चांगली, पचनसंस्थाही होईल मजबूत
3. कॅफिनयुक्त पेय प्या
रक्तदाब कमी असतो, तेव्हा डॉ. झैदी एक कप ब्लॅक कॉफी किंवा ब्लॅक टी पिण्याची शिफारस करतात. ब्लॅक कॉफी आणि चहामध्ये कॅफिन असतं, यामुळे हृदय गती वाढवून रक्तदाब तात्पुरता वाढतो. यामुळे थोडं बरं वाटतं, तरतरी येते.
या गोष्टी लक्षात ठेवा -
हे उपाय फक्त तात्कालिक आरामासाठी आहेत. रक्तदाब कमी असेल तेव्हाच हे उपाय वापरा. थोडं बरं वाटलं की डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या. यासोबतच, हृदयाशी संबंधित समस्या असतील तर मीठ आणि कॅफिन मर्यादित प्रमाणात घ्या.
