तिळाचे कोमट तेल अंगाला लावल्यास होणारे फायदे पुढीलप्रमाणे
1. तिळाचे तेल कोमट करून अंगाला लावल्यास त्वचा मऊ, मुलायम व पोषक होते. तिळाच्या तेलात फॅटी ऍसिड्स मुबलक प्रमाणात असतात. कोमट तेल त्वचेच्या आतपर्यंत शोषले जाते आणि ड्रायनेस कमी करण्यास मदत होते. नियमित लावल्यास त्वचा अधिक ग्लोइंग दिसते.
2. कोरड्या हवेत होणारी ऍलर्जी, खाज, कडकडीत त्वचा यावर तिळाचे तेल हे उत्तम पर्याय आहे. खासकरून पायाच्या टाचा फाटण्यापासून वाचवते.
advertisement
Lip Care Tips : हिवाळ्यात ओठ फाटण्याचा त्रास वाढतोय? 'हे' सोपे उपाय करा, ओठ कायम राहतील मऊ!
3. तीळ तेल उष्ण गुणधर्माचे आहे. यामुळे शरीराला ऊब मिळते आणि थंडीत होणारे दुखणे कमी होते. तसेच स्ट्रेस कमी आणि झोप सुधारते. तीळ तेलातील घटक नर्व्हस सिस्टिम शांत करतात. मालिश केल्याने मन निवांत होते आणि झोप चांगली येते.
4. त्याचबरोबर त्वचेवरील टॉक्सिन्स काढण्यात मदत करते. कोमट तेल त्वचेतील डेड सेल्स सैल करतात. त्यानंतर कोमट पाण्याने आंघोळ केल्यास हे टॉक्सिन्स स्वच्छ निघून जातात.
5. तिळाचे तेल स्किन टोन सुधारते आणि टॅनिंग कमी करते. नियमित वापराने त्वचा उजळ वाटते, कारण तेलात ऍंटिऑक्सिडंट्स जास्त असतात.
कसे लावावे?
2 ते 3 चमचे तिळाचे तेल हलके कोमट करा. हात, पाय, पाठ, मान, पोट संपूर्ण शरीरावर हलक्या हाताने लावा. 10 मिनिटांनंतर कोमट पाण्याने अंघोळ करा. उष्ण पित्ताचा त्रास असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हा उपाय करावा. तसेच उन्हाळ्यात हे तेल लावू नये.





