आयुर्वेदात अनेक घटक आहेत जे अतिशय उपयुक्त आहेत. घरोघरी सहज उपलब्ध असलेल्या ज्येष्ठमध अत्यंत गुणकारी असून जवळपास सात ते आठ प्रकारचे आजार बरे करण्याची ताकद ज्येष्ठमधात आहे. शिक्षक, प्राध्यापक किंवा कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना अधिक बोलावे लागते. सतत बोलल्याने त्याच्या स्वर यंत्रणेला त्रास होतो. त्यामुळे आवाज बसण्यासारख्या त्रास उद्भवतात. अशावेळी ज्येष्ठ मध तोंडात चघळले तर या त्रासापासून आराम मिळतो.
advertisement
या डाळीत असते मटण आणि माशांपेक्षाही जास्त प्रोटीन! वजन नियंत्रित ठेवते, शरीराला होतात हे फायदे
सध्या खोकल्याची साथ वाढलेली आहे. हा खोकला कमी व्हावा यासाठी मधात ज्येष्ठमधाची पावडर टाकून बनवलेले चाटण दिवसातून दोन ते तीन वेळा चाटले तरी बरे वाटते, असं डॉक्टर कळसकर यांनी सांगितलं.
तिखट पदार्थ खाल्ल्यानंतर जळजळ होते. पोटात किंवा छातीतही पित्तामुळे जळजळते त्यावेळी ज्येष्ठ मधाची पावडर पाण्यात आणि विशेषतः तुपात घोळवून खाल्ली तर ही जळजळ ताबडतोब थांबते. त्याचबरोबर ज्येष्ठ मध हे बुद्धिवर्धक रसायन आहे असे वर्णन आयुर्वेदात आहे. त्यामुळे दुधात टाकून रोज सकाळी किंवा सायंकाळी ते दूध प्यायले तर विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होईल.
जॉब करणाऱ्या लोकांना मधुमेह आणि BP चा धोका जास्त? डॉक्टरांकडून जाणून घ्या सत्य
तोंडात अल्सर झाला असेल तर....
तोंडात अल्सर ,छाले पडणे किंवा तोंड आले असेल तर ज्येष्ठ मधाची पावडर करून ती मधत उगाळून त्या ठिकाणी लावावी. ज्येष्ठमध हे चवीला गोड असल्याने ताकद देणारे आहे. तसेच उन्हाळ्यात ज्येष्ठमध आणि चंदन उगाळून चेहऱ्याला लावले तर सन बर्न होत नाही. तसेच कुठे भाजल किंवा चटका लागला तरी ज्येष्ठ मधाची पवडर तुपात घोळवून ती त्या जखमेवर लावावी यामुळे आराम पडतो, असे कळसकर यांनी स्पष्ट केलं.
( टीप : बातमीतील मतं ही तज्ज्ञांची वैयक्तिक मतं आहेत. त्याचे अनुकरण करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)