सोलापूर : गुलियन बॅरी सिंड्रोम म्हणजेच (GBS) च्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. पुण्यात GBS ची लागण झालेल्या सोलापुरातील हत्तुर या गावातील तरुणाचा सोलापुरात उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. या आजाराची नेमकी लक्षणे काय आहेत? गुलियन बॅरी सिंड्रोमपासून स्वतःचे संरक्षण कसा प्रकारे करू शकता? या संदर्भात अधिक माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी Local 18 शी बोलताना दिली.
advertisement
काय आहेत (GBS) चे लक्षणे?
GBS या आजाराची लागण झाल्यानतंर तुमच्या शरीरातली रोगप्रतिकारक शक्ती आजूबाजूच्या मज्जासंस्थेवर हल्ला करते. त्यामूळे थकवा किंवा हातापायाला मुंग्या येणं, झिणझिण्या येणं, अचानकपणे चालताना त्रास होणे, शरीर कमजोर झाल्यासारखे वाटणे, खूप दिवस डायरियाचा त्रास होणे किंवा लकवा मारणे हे लक्षणे दिसतात. तर हा GBS आजार कोणत्याही वयातील व्यक्तींना होतो, असं डॉ. संतोष नवले सांगतात.
हा आजार फारच दुर्मिळ असल्याने याबद्दल सतर्क राहणं गरजेचे आहे. प्रत्येक नागरिकांने पिण्याचं पाणी दूषित राहणार नाही, याची काळजी घ्यावी. दररोज पिण्याचे पाणी बदलावे. तसेच पाणी उकळून प्यावं. यासोबतच नेहमी स्वच्छ आणि ताजं अन्न खावं, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संतोष नवले यांनी केले आहे.
काही त्रास होत असेल तर लगेच डॉक्टरांना दाखवून योग्य तो उपचार करून घ्यावा. यासोबतच नेहमी स्वच्छ आणि ताजं अन्न खावं. यामुळे तुम्हाला पोषकतत्त्व मिळतात. तसेच वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्या. अस्वच्छ ठिकाणी, रस्त्यावरचे किंवा उघड्यावरील पदार्थ खाणे टाळावे. शिजवलेले आणि कच्चं अन्न एकत्र ठेवू नये, या उपयांद्वारे तुम्ही GBS ची लागण होणे टाळू शकता, असंही डॉ. संतोष नवले सांगतात.