ड्रॅगन फ्रूटचे आपल्या शरीराला भरपूर प्रमाणात फायदे आहेत. ड्रॅगन फ्रूटमध्ये मेटालिन नावाचा घटक असतो. मेटालिन हा हृदयाला पोषक असा घटक असल्यामुळे हृदयरोगाशी संबंधित आजार असलेल्या रुग्णांनी आवश्यक ड्रॅगन फ्रूटचे सेवन करावे, असं डॉक्टर अमृता कुलकर्णी सांगतात.
Cancer Signs : त्वचेवरील चामखीळ ठरू शकते सायलेंट किलर! दुर्लक्ष कराल तर होईल पश्चाताप
advertisement
ड्रॅगन फ्रूटमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. यामुळे मधुमेह असलेल्या पेशंटना फायदा होतो. ड्रॅगन फ्रूटमध्ये फिनोलिक ॲसिड, फ्लायनाइड ग्लुटीन सारखे घटक असल्याने अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे जे रुग्ण कॅन्सरशी झुंज देत आहेत. जे कॅन्सरने पीडित आहेत अशा रुग्णांनी ड्रॅगन फ्रूटच सेवन आवश्यक करावं.
त्याचबरोबर अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी ने भरपूर असल्यामुळे त्वचेशी निगडित रोग दूर होण्यास मदत होते त्याचबरोबर त्वचेवर सुरकुत्या पडण्याची समस्या देखील दूर होते. त्याचबरोबर फायबर भरपूर प्रमाणात असल्याने अपचन ॲसिडिटी बद्धकोष्ठता यासारख्या आजारांवर देखील हे फळ परिणामकारक आहे, असंही डॉक्टर अमृता कुलकर्णी यांनी सांगितलं.