किडनी खराब झाल्यावर कुठली लक्षणं आढळतात?
यामध्ये किडनी खराब झाली की त्याला क्रॉनिक म्हणतात. मळमळणे, उलटी होणे दम लागतो, भूक लागत नाही चक्कर येते, लघवी कमी किंवा जास्त प्रमाणात होते, डोळ्यांच्या सभोवताली सूज असते, काम कराव वाटतं नाही, डोळ्यांच्या आणि पायाच्या भोवती सूज येते.
Dengue: अरेच्चा, डास पळवणारं झाडं? घरात लावताच डेंग्यू, मलेरियापासून मिळेल सुटका
advertisement
यासाठी कुठली काळजी घ्याल?
ब्लड टेस्ट करू शकतो. सोनोग्राफीमध्ये खडे सापडले तर सिटी स्कॅन करू शकतो. किडनीतले खडे काढून फंक्शन नॉर्मल होत.
खराब होण्याची लक्षणं ?
किडनी ही डायबिटीसमुळे ब्लड प्रेशर, रक्त वाहिन्या चॉकप झाल्यामुळे तसेच किडनीमध्ये खडे असतील यामुळे किडनी खराब होत असते.
वेळीच निदान करणे गरजेचे
किडनी निकामी झाल्यामुळे रुग्णाच्या लघवीच्या रंगात बदल होतो. किडनी निकामी होण्याचे हे प्रमुख लक्षण मानले जाते. याशिवाय किडनी निकामी होण्याची इतरही अनेक लक्षणं शरीराला जाणवत असतात. ते वेळीच ओळखून त्यावर निदान करणे गरजेचे असते. अनेक घटनांमध्ये किडनी बरीच खराब झाल्यावर रुग्णाला त्याबद्दलची माहिती मिळत असते. परिणामी हातातील वेळ निघून गेलेली असते आणि नंतर डायलिसिसची वेळ येते. यामुळे वेळीच ही लक्षणं दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन वेळीच उपचार करू शकता, असं बी. जे महाविद्यालयाचे डॉक्टर संजीव ठाकूर यांनी सांगितले.