‘कॉट डेथ’ची अनेक कारणे आहेत. याचं एकच एक असं कारण नाही. एक महिन्यांच्या बाळापासून ते एक वर्षाच्या बाळापर्यंत कॉट डेथ होऊ शको. जेव्हा बाळ दूध पिता पिता झोपतं आणि बाळाचा ढेकर काढला नाही तही देखील मृत्यू होऊ शकतो. बाळ आईचं दूध पिऊन तसंच झोपल्यास कधी कधी बाळाला झोपेतच गरळ येतो. तो अन्ननलिकेत जाण्याऐवजी श्वासनलिकेत जातो. त्यामुळे बाळाचा श्वास थांबून बाळाचा झोपेतच मृत्यू होऊ शकतो, असं डॉक्टर सांगतात.
advertisement
Health Tip : ऐन तारुण्यात का येतोय हार्ट अटॅक? डाॅक्टरांनी सांगितलं त्यामागचं नेमकं कारण!
काही वेळा श्वासोच्छवास अनियमित होतो. बाळ अर्धवट झोपेत असेल तर जागं झाल्यामुळे त्याबाबत कळू शकतं. परंतु, बाळ जास्त गाढ झोपेत असेल आणि मेंदूत क्षणिक बिघाड झाल्यास बाळाला जाग येत नाही. त्यामुळे बाळाचा श्वास थांबतो आणि अचानक मृत्यू होतो. तर काही वेळा झोळीत टाकल्यानंतर झोपेत ताण येऊन किंवा इतर कारणांनी देखील त्याचा मृत्यू होऊ शकतो.
काय काळजी घ्यावी ?
बाळाला दूध पाजताना आईने झोपू नये बेडवर पडून दूध पाजत असाल तरी जागे राहून लक्ष दिले पाहिजे. बाळाला दूध पाजल्यावर लगेच झोपवू नये बाळाचा ढेकर काढणे गरजेचे आहे. ढेकर काढूनच बाळाला झोपी लावावे. तसेच बाळाच्या पाण्यात खेळणी ठेवणे बाळाचे अंथरूण स्वच्छ ठेवावे. त्याचप्रमाणे बाळाच्या डोक्याखाली जास्त जाड किंवा मऊ उशीचा वापर करू नये पाण्यात बाळाची स्थिती बदलत जावी. ही काही काळजी घेऊन आपण कॉट डेथ थांबवू शकतो, असे डॉक्टर श्रुती धनेश्वर सांगतात.