Health Tip : ऐन तारुण्यात का येतोय हार्ट अटॅक? डाॅक्टरांनी सांगितलं त्यामागचं नेमकं कारण!
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
हल्ली तरुण वयोगटातील अनेक सामान्य लोक, अगदी 30 वर्षांपासूनच, छातीत वेदना आणि हार्ट अटॅकमुळे मृत्यूमुखी पडताना दिसत आहेत. पूर्वी हृदयविकार फक्त वृद्ध...
advertisement
advertisement
advertisement
पण आजकाल अनेक सामान्य लोकांना 50 वर्षांपेक्षा कमी वयात छातीत दुखण्याचा अनुभव येतोय. काही जणांचा तर 30 व्या वर्षीच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची प्रकरणं आहेत. कोरोनाच्या दुष्परिणामांमुळे अशा तरुणांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होत असल्याचं म्हटलं जात असलं, तरी डॉक्टर सांगतात की याचं मुख्य कारण आनुवंशिक बदल हे आहे.
advertisement
हृदयरोगतज्ज्ञ मुरलीधरन म्हणाले की, हार्ट अटॅक आणि मायोकार्डियल इन्फेक्शन या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ते पुढे म्हणाले की, ज्यांना हृदयविकाराचा झटका येतो, त्यांना तातडीने प्रथमोपचार मिळाल्यास वाचवता येऊ शकतं. डॉ. मुरलीधरन यांनी सांगितलं की, निरोगी जीवनशैली हाच हार्ट अटॅक टाळण्याचा एकमेव मार्ग आहे.