TRENDING:

तरुणपणी हृदयविकाराचा झटका, काय आहे नेमकी कारणं?, छातीत दुखत असेल तर करा हा उपाय

Last Updated:

आजकाल तरुणांना हृदयविकाराचा झटका येण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांच्या खाण्याच्या अनियमित सवयी आणि दुसरे म्हणजे प्रदूषण हे आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अभिषेक माथुर, प्रतिनिधी
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

हापुड, 27 डिसेंबर : सध्याच्या काळात तरुणांमध्ये सर्वात जास्त हृदयविकाराच्या घटना समोर येत आहेत. चालताना किंवा काम करताना तरुणांना अचानक हृदयविकाराचा झटका येतो, अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. गेल्या आठवड्यात तर एका तरुणाचा क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला.

उत्तरप्रदेशातील हापूड येथे गेल्या एका महिन्यात 40 वर्षांपेक्षा कमी वयाच्या तब्बल 17 तरुणांना हृदयविकाराचा झटका आला. तरुणांमध्ये वाढत्या हृदयविकाराच्या समस्येबाबत लोकल18 च्या टीमने हापूड जिल्ह्यातील ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. हरिओम शर्मा यांनी माहिती दिली.

advertisement

यावेळी त्यांनी सांगितले की, काळजी जर घेतली तर हृदयविकाराच्या समस्येपासून वाचता येऊ शकते. आजकाल तरुणांना हृदयविकाराचा झटका येण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांच्या खाण्याच्या अनियमित सवयी आणि दुसरे म्हणजे प्रदूषण हे आहे. आजच्या काळात तरुणाई जंक फूडचा सर्वाधिक वापर करत आहे. तरुणांनी जंक फूड खाणे टाळावे. जंक फूडमुळे लठ्ठपणा वाढतो, रक्तदाब वाढतो आणि या सगळ्यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. अशा स्थितीत तरुणांनी शक्यतो बाहेरचे अन्न सोडून घरचेच अन्न खावे, असा सल्ला त्यांनी दिला.

advertisement

रक्ताचा पुरवठा होतो बंद -

त्यांनी पुढे सांगितले की, हृदयविकाराच्या झटक्यामध्ये हृदयापर्यंत पोहोचणाऱ्या रक्तवाहिन्या बंद होतात आणि त्यामध्ये कोलेस्टेरॉल जमा होते. हृदयाला रक्ताचा पुरवठा लहान रक्तवाहिन्यांद्वारे होतो आणि रक्तपुरवठा थांबला की छातीत वेदना किंवा जडपणा जाणवू लागतो, त्यामुळे जंक फूड खाणे टाळावे.

डॉ. हरिओम शर्मा यांनी विशेष माहिती देताना सांगितले की, तरूणांना छातीत कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा जडपणा जाणवत असेल, तसेच एक-दोन दिवसांत अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला, तर त्यांनी ताबडतोब डिस्प्रिन टॅब्लेट पाण्यात विरघळवून प्यावी आणि नंतर जवळच्या डॉक्टरांची मदत घ्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला.

advertisement

Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती तज्ञांशी झालेल्या चर्चेवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. प्रत्येक व्यक्तीच्या गरजा वेगळ्या असतात, त्यामुळे कोणतीही गोष्ट डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच वापरा. लोकल18 ची टीम कोणत्याही वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानीस जबाबदार राहणार नाही, कृपया हे लक्षात घ्यावे.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
तरुणपणी हृदयविकाराचा झटका, काय आहे नेमकी कारणं?, छातीत दुखत असेल तर करा हा उपाय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल