त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे सांगतात की, हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते. त्यामुळे आपल्या त्वचेला खाज सुटते आणि अनेक समस्या निर्माण होतात. त्यासाठी एकच सोपा आणि घरगुती उपाय आहे तो म्हणजे संपूर्ण शरीराला खोबरेल तेल लावणे. पण खोबरेल तेल लावताना ते अंघोळ झाल्यावर ओल्या अंगावर लावावे. त्यामुळे त्वचेचा ओलावा टिकून राहतो.
advertisement
Health Tips : डिटॉक्स ड्रिंक घेताय? खरंच शरीर साफ होत का? पाहा तुमच्या मनातील प्रश्नाचं उत्तर
खोबरेल तेल ओल्या अंगावर लावावे
अंग कोरडे करून तेल लावल्यास ते दीर्घकाळ टिकत नाही. त्वचा कोरडी होऊन खाज सुटते. त्यामुळे खोबरेल तेल ओल्या अंगावर लावावे, हे सर्वात महत्त्वाचे आहे. त्यानंतर तुम्ही पॅराफीन असलेले, एलोवेरा असलेले मॉइश्चरायझर सुद्धा अंगाला लावू शकता. ते सुद्धा लावताना ओलसर अंगावर लावावे, असेही त्यांनी सांगितले.
त्वचा नरम राहण्यासाठी खोबरेल तेल उपयुक्त
हिवाळ्यात त्वचेची काळजी घेताना नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्या. आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार प्रॉडक्ट वापरणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपल्याला त्वचेच्या समस्या नेहमी नेहमी उद्भवत नाहीत. हिवाळ्यात अंगाला खोबरेल तेल लावणे कधीही फायद्याचे आहे. त्याने त्वचा नरम राहते आणि उलत नाही, असेही डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी सांगितले.





