Health Tips : डिटॉक्स ड्रिंक घेताय? खरंच शरीर साफ होत का? पाहा तुमच्या मनातील प्रश्नाचं उत्तर
- Published by:Mohan Najan
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
बाजारामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वेगवेगळे डिटॉक्स ड्रिंक उपलब्ध आहेत पण ते आपण घेता का म्हणजे कारण त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शुगरचा वापर हा केलेला असतो.
छत्रपती संभाजीनगर: आजकाल सगळीकडे डिटॉक्स ड्रिंक्सचा ट्रेंड दिसतोय... कुणी लिंबू-पाणी घेतंय, कुणी पुदिनं-काकडीचं वॉटर म्हणतात शरीर साफ होतं, पण खरंच असं होतं का? किंवा खरंच हे डिटॉक्स वॉटर आहे ते आपल्यासाठी फायदेशीर आहे का? याविषयी आहार तज्ज्ञ प्राची डेकाटे यांनी माहिती सांगितलेली आहे.
सर्वात पहिले तर डिटॉक्स वॉटर हे एक फॅड डायटचा प्रकार आहे. मी अनेक ठिकाणी बघितलं आहे की लोक काही व्हाट्सअप ग्रुप बनवतात त्यावरती वेगवेगळ्या डिटॉक्स ड्रिंकच्या रेसिपी टाकतात की तुम्ही काकडीचे पाणी प्या किंवा तुम्ही तर कुठले पाणी प्या जेणेकरून तुमचं शरीर आहे डिटॉक्स होईल. ABC ज्यूस आहे किंवा काकडीचे ज्यूस आहे असं जर तुम्ही घेतलं तर ते फायदेशीर होतं पण तशी काही एक आवश्यकता नसते. आपल्या शरीरासाठी कारण की आपल्या शरीरामध्ये ऑटोमॅटिकली सर्व गोष्टी या डिटॉक्स होत असतात.
advertisement
बाजारामध्ये देखील मोठ्या प्रमाणात वेगवेगळे डिटॉक्स ड्रिंक उपलब्ध आहेत पण ते आपण घेता का म्हणजे कारण त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शुगरचा वापर हा केलेला असतो. त्यासोबतच त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रिझर्व्हेटिव्ह असतात किंवा मिठाचा देखील वापर असतो. ते आपल्यासाठी हानिकारक असतं त्यामुळे डिटॉक्स वॉटर घेतल्यामुळे आपलं शरीर छान राहतं हा एक खूप मोठा गैरसमज आहे, असं आहार तज्ज्ञ प्राची डेकाटे सांगतात.
advertisement
आपल्या शरीरामध्ये किडनी, लिव्हर किंवा स्कीन हे जे अवयव आहेत हे सर्व ऑटोमॅटिकली शरीरातील सर्व गोष्टी डिटॉक्स करण्याचं काम करतात. तुम्हाला डिटॉक्स वॉटर घेण्याची काही एक आवश्यकता नाही. तुम्ही दिवसभरामध्ये व्यवस्थित पाणी घ्या व्यवस्थित झोप घ्या जेणेकरून तुमचं शरीर ऑटोमॅटिकली हे डिटॉक्स होईल.
रात्री 11 ते 3 या वेळेमध्ये शरीर डिटॉक्स होण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे तुम्ही लवकर झोपावं म्हणजे दहा वाजता झोपावं जेणेकरून तुमचं शरीर हे चांगले डिटॉक्स होईल आणि त्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे डिटॉक्स ड्रिंक घेण्याची आवश्यकता भासणार नाही, असंही आहार तज्ज्ञ प्राची डेकाटे सांगतात.
view commentsLocation :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
October 29, 2025 5:57 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips : डिटॉक्स ड्रिंक घेताय? खरंच शरीर साफ होत का? पाहा तुमच्या मनातील प्रश्नाचं उत्तर

