जालना: भारतीय संस्कृतीत आरोग्यासाठी सूर्याची उपासना केली जाते. सूर्यनमस्कार करून आपण आपले शरीर तंदुरुस्त ठेवू शकतो. भारतीय संस्कृतीमध्ये सूर्यनमस्कार करण्याची फार जुनी परंपरा राहिली आहे. 16 फेब्रुवारी रोजी जागतिक सूर्यनमस्कार दिन आहे. या निमित्ताने सूर्यनमस्कार करण्याचे आपल्या शरीरासाठी फायदे आहेत. पण सूर्यनमस्कार कोणी करावा व कोणी करू नये यासंबंधीची माहिती अनेकांना नसते. याबाबत जालना येथील आहार तज्ज्ञ व योगशिक्षिका गीता कोल्हे यांनी सांगितले आहे.
advertisement
मानसिक आणि बौद्धिक क्षमता वाढण्यास मदत
सूर्यनमस्कार हा अतिशय चांगला व्यायाम प्रकार आहे. ज्यामुळे शारीरिक मानसिक आणि बौद्धिक क्षमता वाढण्यास मदत होते. नियमित सूर्यनमस्कार केल्याने शरीर बळकट होते. शरीराची लवचिकता वाढते. बॉडीची स्ट्रेंथ वाढते. स्टॅमिना वाढतो. मानसिक स्तरावर विचार केल्यास सूर्यनमस्कार केल्याने मानसिक संतुलन ठीक राहण्यासाठी अतिशय फायदा होतो. बौद्धिक पातळीवर विचार केल्यास सूर्यनमस्कार करत असताना सेरेटोनिन ऑक्सि टॉनिन आणि डोपा माईन हे हार्मोन सीक्रेट होत असतात. हार्मोनचे सिक्रेशन व्यवस्थित झाल्यामुळे आपली बौद्धिक पातळी वाढते. आपला ताण तणाव कमी होतो आणि बौद्धिक पातळी वाढण्यास मदत होऊन आनंदी राहण्यासाठी देखील खूप मदत होते.
पाठदुखी आणि कंबरदुखीपासून मिळेल आराम; नियमित करा ही 4 योगासने PHOTOS
सूर्यनमस्कार कुणी करू नये?
सूर्यनमस्कार हे वयाच्या बारा वर्षांपासून ते त्याला कुठलीही वयोमर्यादा नाही. वयाच्या बारा वर्षापासून पुढे शारीरिक क्षमता असेपर्यंत तुम्ही सूर्यनमस्कार करू शकता. सूर्यनमस्कार हा खूप आजारी व्यक्ती ज्यांना खूप विकनेस आलेला आहे अशा व्यक्तीने करू नये. त्याचबरोबर गर्भवती महिला यांनी सूर्यनमस्कार करू नये. बारा वर्षाखालील लहान मुलांनी देखील सूर्यनमस्कार करू नये, असे गीता कोल्हे यांनी सांगितलं.
अनियमित मासिक पाळी आणि लठ्ठपणा, महिलांच्या समस्यांवर ही योगासने रामबाण उपाय, Video
प्राचीन काळापासून भारतात सूर्यनमस्कार करण्याची प्रथा आहे. प्राचीन काळातील ऋषीमुनी, योगी पुरुष हे सूर्यनमस्काराला प्राधान्य द्यायचे. सूर्यनमस्कार हा जगाच्या पाठीवर सर्वोत्तम व्यायाम प्रकार आहे. भारतातील वातावरणाशी सुसंगत असा हा व्यायाम प्रकार असल्याने भारतातील लोकांनी सूर्यनमस्कार या व्यायाम प्रकारालाच प्राधान्य दिले पाहिजे. पाश्चिमात्य देशांमध्ये वातावरणात शितलता असल्याने झुंबा आणि एरोबिक्स हे प्रकार केले जातात. भारतातही हे प्रकार करण्यास हरकत नाही. मात्र सूर्यनमस्कार प्राधान्याने करावा, असं आवाहन योगशिक्षिका गीता कोल्हे यांनी केलं.