मखाना म्हणजेच फॉक्स नट्स हे केवळ हलकेच नाहीत तर अनेक आरोग्यदायी गुणांनी भरलेले आहेत. त्यामुळे मखान्याची खीर चवदार तर लागतेच, पण त्याचबरोबर शरीराला अनेक फायदेही देते. मखाना पचनासाठी चांगला, वजन कमी करण्यास मदत करणारा आणि तणाव कमी करणारा आहे. रात्री चांगली झोप येण्यासाठीही मखाना उपयुक्त मानला जातो.
मग चला, आता घरच्या घरी अतिशय सोप्या पद्धतीने बनवूया ही खास आणि पौष्टिक मखान्याची खीर
advertisement
मखान्याची खीर बनवण्यासाठी लागणारी सामग्री
मखाना - 2 कप
दूध - 1 लिटर
साखर - चवीनुसार
घी - 2 चमचे
वेलची पावडर - 1/2 चमचा
बदाम, पिस्ता, काजू - बारीक तुकडे
मखान्याची खीर कशी बनवाल?
1. मखाना भाजून घ्या
सर्वप्रथम एका पॅनमध्ये थोडंसं घी गरम करा आणि त्यात मखाना घालून मंद आचेवर कुरकुरीत आणि हलका सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. मखाना चांगला भाजल्याने खीरमध्ये त्याचा स्वाद छान येतो.
2. दूध उकळून घ्या
आता एका खोलगट भांड्यात एक लिटर दूध घाला आणि उकळी येऊ द्या. दूध उकळताना त्यात भाजलेले मखाने घालून मिक्स करा.
3. ड्रायफ्रूट्स रोस्ट करा
मखाने दूधात मऊ होत असताना दुसऱ्या पॅनमध्ये घी गरम करा आणि त्यात बदाम, काजू, पिस्ता हलकेसे रोस्ट करून घ्या.
4. खीर घट्ट करा
मखाने दूधात हळूहळू एकजीव होतील आणि खीर थोडी घट्ट होऊ लागेल. सतत हलवत राहा जेणेकरून तळाला लागू नये.
5. शेवटची चव
खीर योग्य घट्टपणाला आली की त्यात साखर आणि वेलची पावडर घालून व्यवस्थित मिसळा. दोन मिनिटे शिजू द्या आणि गॅस बंद करा. तुमची सुगंधित, स्वादिष्ट आणि पौष्टिक मखान्याची खीर तयार. तुम्ही ही खीर गरम किंवा थंड जशी आवडेल तशी सर्व्ह करू शकता.
