हे औषध म्हणजे Hi1a नावाचे प्रोटीन आहे. हे प्रोटीन ऑस्ट्रेलियन फनल वेब कोळ्याच्या विषातील एका अणुची नक्कल करते, हे हार्ट ॲटॅक आल्यावर हृदयाच्या ऊतींना ॲसिडिक होण्यापासून रोखते. यामुळे हार्ट ॲटॅक आल्यावर होणारे टिश्यू डॅमेज कसे नीट करता येतील याचा शोध संशोधक घेत आहेत.
Hi1a हे पहिले औषध असेल जे हार्ट ॲटॅकमुळे होणाऱ्या ऊतींच्या नुकसानावर थेट काम करेल, अशी शास्त्रज्ञांना आशा आहे. सुरुवातीला ते रुग्णालयांमध्ये वापरण्यासाठी विकसित केले जाईल. नंतर ते इमर्जन्सी सर्व्हिसेससाठी उपलब्ध करून देण्याची योजना आहे. रिसर्च टीमने लाइव्ह सायन्सला सांगितले की हार्ट ॲटॅकनंतर किती वेळाने हे औषध देणे प्रभावी ठरेल, याची अद्याप माहिती नाही.
advertisement
रिसर्च टीमच्या मते, Hi1a ट्रान्सप्लांट करण्यासाठी उपलब्ध डोनर हार्ट्सची संख्या वाढवण्यासाठी वापरता येऊ शकते. Hi1a डोनरच्या शरीरातून हृदय काढण्याच्या प्रक्रियेदरम्यान होणारे नुकसान टाळू शकते, असेही या टीमने सांगितले.
भयानक स्वप्नांपासून सुटका हवीये? झोपताना उशीखाली ठेवा 7 खास गोष्टी, मिळेल शांत झोप
हे औषध कसे काम करते?
संशोधकांच्या मते, Hi1a ॲसिड-सेन्सिंग आयन चॅनेल 1a (ASIC1a) नावाच्या लहान रस्त्याला टार्गेट करते. हे पदार्थांना सर्क्युलेटरी सिस्टिमसह पूर्ण शरीरात पेशींमध्ये आणि बाहेर जाण्याची परवानगी देते. हार्ट ॲटॅकदरम्यान, रक्त प्रवाह कमी झाल्याने हृदयाच्या स्नायूंपर्यंत ऑक्सिजन पोहोचणे थांबते. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे सेल्युलर चेन रिअॅक्शन सुरू होते जी पेशींच्या पृष्ठभागावरील ASIC1a चॅनेल्सला ॲक्टिव्हेट करते.
ASIC1a चॅनेल्स उघडल्यावर चार्ज्ड मॉलिक्युल्स आत शिरतात व हृदयाच्या ऊतींना खूप ॲसिडिक बनवतात. यामुळे ऊती मरतात. क्वीन्सलँड विद्यापीठातील मॉलिक्यूलर बायोसायन्सचे प्राध्यापक ग्लेन किंग यांनी सांगितले की Hi1a ASIC1a या प्रक्रियेला थांबवण्यासाठी ASIC1a चॅनेल्सला ब्लॉक करते.
युरोपियन हार्ट जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या २०२३ च्या एका अभ्यासात, किंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखवले होते की उंदरांना Hi1a इंजेक्शन दिल्याने हार्ट ॲटॅकवेळी रक्त प्रवाहाच्या कमतरतेमुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवता येते. पेट्री डिशेसमध्ये मानवी हृदयाच्या स्नायूंच्या पेशींमध्ये असेच परिणाम दिसून आले.
औषध केव्हा उपलब्ध होईल?
माणसांवरील सुरुवातीचे ट्रायल यशस्वी झाल्यास रिसर्च टीम ट्रायलचे प्रमाण वाढवेल. फेज दोन आणि फेज तीनमधील ट्रायल्सच्या आधारावर औषधाची सुरक्षा व प्रभावाची तपासणी केली जाईल. क्लिनिकल ट्रायल पूर्ण व्हायला खूप वर्षे लागतात, त्यामुळे रुग्णांसाठी हे औषध केव्हा उपलब्ध होईल हे सांगता येणे कठीण आहे.