तोंड म्हणजे केवळ दोनदा दात घासणं नाही तर आयुर्वेदात, पचन, श्वासोच्छवास आणि एकूण आरोग्याचं प्रवेशद्वार मुख म्हणजे तोंड मानलं जातं. तोंडाच्या स्वच्छतेसाठी, रसायनयुक्त माउथवॉश वापरतो, पण ते केवळ आपल्या दातांसाठीच नाही तर आपल्या पोटाच्या पचनसंस्थेसाठी देखील हानिकारक ठरु शकतात.
Digestion : जड पोट होईल हलकं, घरातल्या दोन पदार्थांमुळे पचन होईल सुलभ
advertisement
रासायनिक टूथपेस्ट आणि माउथवॉशच्या वापरामुळे हळूहळू तोंडातला नैसर्गिक ओलावा आणि बॅक्टेरियाचं संतुलन बिघडू शकतं. बहुतांश माउथवॉशमधे उच्च पातळीची रसायनं असतात, ज्यामुळे फ्रेश वाटतं पण तोंडातील नैसर्गिक ओलावा हिरावून घेतला जातो आणि लाळेचं उत्पादन कमी होतं. तोंडाच्या दुर्गंधीवर घरगुती उपाय करुन पाहता येईल, तो म्हणजे, हर्बल माऊथवॉश.
काही औषधी वनस्पती, संतुलित डोस आणि योग्य पद्धत जाणून घेणं आवश्यक आहे. हे हर्बल माउथवॉश केवळ तोंडाच्या दुर्गंधीपासूनच नाही तर दात आणि हिरड्यांच्या समस्यांपासून देखील आराम देईल.
Hair Care : छोट्या चुकांमुळे केसांचं मोठं नुकसान, मजबूत केसांसाठी खास टिप्स
हर्बल माउथवॉश कसा बनवायचा समजून घेऊया - यासाठी, लवंग, बडीशेप, दालचिनी, तुरटी आणि पाणी एकत्र करून उकळा. यात कोणतेही कृत्रिम रंग किंवा चव वापरू नका. पाणी अर्ध कमी झाल्यावर ते गाळून घ्या, थंड करा आणि काचेच्या भांड्यात ठेवा. सकाळी आणि रात्री या नैसर्गिक हर्बल माउथवॉशनं तोंड स्वच्छ धुवा. यानंतर पुन्हा पाण्यानं तोंड स्वच्छ धुण्याची गरज नाही.
हर्बल माउथवॉशमुळे मुख दुर्गंधी दूर होते तसंच दातही मजबूत होतात. हिरड्यांची सूज कमी होते, यामुळे दातांचा पिवळेपणा कमी होतो आणि जंतू नष्ट होतात. हिरड्यांना रक्त येत असेल त्यासाठीही याचा वापर केला जाऊ शकतो. या माउथवॉशमधील लवंगेमुळे हिरड्या मजबूत होतात.
