अशावेळी काय कराल?
एक टब कोमट पाण्याने भरा आणि त्यात थोडं मीठ (रॉक सॉल्ट/सेंधा मीठ) टाका. पाय 15-20 मिनिटे त्यात ठेवा. हे रक्ताभिसरण सुधारते आणि सूज कमी करते.
हळदीचा लेप लावा
हळद नैसर्गिक वेदनाशामक आहे. हळदीत थोडं खोबरेल तेल किंवा सरसों तेल मिसळून पाया दुखण्याच्या जागी लावा आणि काही वेळ तसेच ठेवा.
advertisement
तिळाच्या तेलाने मालिश
तिळाचं तेल किंचित गरम करून हलक्या हाताने पायावर मालिश करा. यामुळे स्नायूंचा ताण कमी होतो आणि आराम मिळतो.
पाय वर उचलून ठेवणे
पायातील रक्तदाब कमी करण्यासाठी झोपताना पायाखाली उशी ठेवा. यामुळे सूज कमी होते.
आल्याचा चहा किंवा हळदीचे दूध
आल्यात अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. आल्याचा चहा किंवा हळदीचे दूध घेतल्याने आतील वेदना कमी होतात.
पाय दुखणे ही तात्पुरती समस्या असते, पण ती वाढू नये यासाठी पुरेशी विश्रांती, हलकी स्ट्रेचिंग आणि पुरेसं पाणी पिणंही महत्त्वाचं आहे. काही दिवसांत वेदना कमी झाली नाही तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)