कधी कधी मानदुखी इतकी तीव्र होते की वेदना असह्य होते. यामुळे दिवस शांत जात नाही आणि रात्री झोपही लागू शकत नाही. वेदनाशामक औषध असली तरी ती कायम घेणं देखील नेहमीच बरं वाटत नाही. यासाठी एक उपाय घरी करुन पाहा. हा उपाय म्हणजे कायमस्वरुपी उपचार नाही पण यामुळे तात्कालिक आराम मिळू शकेल.
advertisement
ताण - मानसिक ताण आणि चिंता यामुळे मानेच्या नसांवर दबाव येतो. ज्यामुळे या वेदना अधिक जाणवतात. म्हणून, ताण कमी करण्याचा प्रयत्न करा.
Digestion: गॅसेसची समस्या होईल दूर, हा सोपा उपाय लक्षात ठेवा
स्नायूंवर ताण - स्नायूंवर ताण म्हणजेच muscle strain हे देखील यामागचं प्रमुख कारण आहे. जास्त वजन उचलणं, मानेला अचानक झटका देणं किंवा उलटं झोपणं, यामुळे नसांवर ताण येऊ शकतो, ज्यामुळे वेदना वाढतात.
बसण्याची किंवा झोपण्याची चुकीची पद्धत - बराच वेळ वाकून बसणं, संगणकावर काम करताना बसण्याची चुकीची पद्धत किंवा जास्त स्क्रीन पाहणं यामुळे वेदना वाढू शकतात.
Face Mask : कॉफीमुळे होईल चेहरा मुलायम, हे पाच कॉफी मास्क करतील जादू
वेदना, डोकेदुखी, सूज किंवा मानेच्या इतर समस्यांनी ग्रस्त असलेल्यांसाठी एक उपाय करता येईल. एक टॉवेल घ्या आणि तो गरम पाण्यात भिजवा, भिजल्यानंतर तो चांगला पिळून घ्या. त्यावर थोडं विक्स लावा, विक्स लावल्यानंतर टॉवेल मानेवर ठेवून शेका. टॉवेल किमान अर्धा तास मानेवर ठेवा. यामुळे वेदना, डोकं दुखणं, सूज किंवा इतर समस्यांपासून आराम मिळेल.
याव्यतिरिक्त डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या, अनेकवेळा औषधं, घरगुती उपाय आणि व्यायामामुळे दुखणं कमी होऊ शकतं.
