TRENDING:

Hot Vs Cold Water : हिवाळ्यात केस गरम पाण्याने धुवावे की थंड? 99% लोक करतात 'ही' चूक! वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Last Updated:

Hot Or Cold Water Which Is Good For Hair : हिवाळ्यात आपल्याला गरम पाणी अंगावर घेणं कितीही चांगलं वाटत असलं तरी आरोग्यासाठी किंवा आपल्या केसांसाठी चांगलं आहे की नाही हे माहित असणं आवश्यक आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : हिवाळ्यात मस्तपैकी गरम पाण्याने आंघोळ करायला कोणाला आवडत नाही? आपल्याला गरम पाणी अंगावर घेणं कितीही चांगलं वाटत असलं तरी आरोग्यासाठी किंवा आपल्या केसांसाठी चांगलं आहे की नाही हे माहित असणं आवश्यक आहे. केसांचे नुकसान झाल्यानंतर लोक महागडे तेल, शॅम्पू आणि हेअर स्पावर हजारो रुपये खर्च करतात, पण त्यांना काहीही परिणाम मिळत नाही. म्हणूनच हिवाळ्यात सर्वात मोठा प्रश्न उद्भवतो तो म्हणजे केस धुण्यासाठी कोणते पाणी चांगले आहे गरम, थंड की कोमट पाणी?
हिवाळ्यात पाण्याचे तापमान का असते महत्त्वाचे?
हिवाळ्यात पाण्याचे तापमान का असते महत्त्वाचे?
advertisement

आजच्या धावपळीच्या जीवनात आणि वाढत्या प्रदूषणात केस गळणे हा एक सामान्य त्रास झाला आहे. केस सुंदर आणि चमकदार ठेवायला कोणाला आवडत नाही, यासाठी बहुतेक लोक महागडे शॅम्पू आणि क्रीम वापरतात. पण हिवाळ्यातील कडाक्याच्या थंडीत बरेच लोक गरम पाण्याने केस धुतात, तर बरेच जण थंड पाण्याने केस धुतात. केस निरोगी ठेवण्यासाठी पाण्याचे तापमान लक्षात ठेवणे देखील महत्त्वाचे आहे. अन्यथा एका चुकीमुळे तुमचे केस कमकुवत होतील आणि तुटतील.

advertisement

हिवाळ्यात पाण्याचे तापमान का असते महत्त्वाचे?

केसांच्या आरोग्यात पाण्याचे तापमान खूप महत्त्वाची भूमिका बजावते, विशेषतः हिवाळ्यात. जर तुम्ही तुमचे केस चुकीच्या तापमानाच्या पाण्याने धुतले तर ते तुमचे केस कोरडे करू शकते. जर पाण्याच्या तापमानाची काळजी घेतली नाही तर केसांमध्ये कुरळेपणा वाढू शकतो, टाळूची जळजळ होऊ शकते आणि कालांतराने केस गळण्याची समस्या देखील वाढू शकते. म्हणूनच गरम, थंड आणि कोमट पाण्याचा केस आणि टाळूवर कसा परिणाम होतो हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

advertisement

गरम पाण्याचा केसांवर होणार परिणाम

तेलकट केस असलेल्या लोकांसाठी गरम पाणी फायदेशीर ठरू शकते. ते केसांचा वरचा थर उघडण्यास, घाण आणि जास्त तेल काढून टाकण्यास मदत करते. परंतु खूप गरम पाण्याचा वारंवार वापर केल्याने केसांमधील नैसर्गिक तेल निघून जाऊ शकते, ज्यामुळे केस कोरडे होऊ शकतात आणि केस गळती वाढू शकते.

advertisement

थंड पाण्याचा केसांवर होणारा परिणाम

थंड पाणी केसांच्या क्यूटिकल्स बंद करते, ज्यामुळे आत ओलावा टिकून राहतो. यामुळे केस गुळगुळीत, चमकदार आणि कमी कुरकुरीत दिसतात. हे विशेषतः कोरड्या आणि खराब झालेल्या केसांसाठी फायदेशीर आहे. याशिवाय, थंड पाणी टाळूमध्ये रक्ताभिसरण वाढविण्यास मदत करते, जे केसांच्या वाढीसाठी चांगले मानले जाते.

टाळूसाठी कोणते पाणी जास्त फायद्याचे?

advertisement

संवेदनशील टाळू असलेल्या लोकांनी गरम पाणी टाळावे. कारण त्यामुळे जळजळ, खाज सुटणे आणि एक्झिमा सारख्या समस्या उद्भवू शकतात. थंड किंवा कोमट पाणी टाळूला आराम देते आणि सूज कमी करते.

तज्ञांच्या मते, केस धुण्याच्या योग्य पद्धतीचा विचार केला तर बहुतेक लोकांसाठी कोमट पाणी हा सर्वोत्तम पर्याय आहे. ते केसातील ओलावा कमी न करता टाळू स्वच्छ करते. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही शेवटी थंड किंवा कोमट पाण्याने तुमचे केस पुन्हा एकदा धुवू शकता. योग्य तापमानातील पाणी वापरून तुम्ही तुमचे केस दीर्घकाळ निरोगी, मऊ आणि मजबूत ठेवू शकता.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्यांच्या पदरी निराशा, सोयाबीन दर घसरले,तूर आणि कांद्याला काय मिळाला भाव?
सर्व पहा

Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Hot Vs Cold Water : हिवाळ्यात केस गरम पाण्याने धुवावे की थंड? 99% लोक करतात 'ही' चूक! वाचा तज्ज्ञांचा सल्ला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल