TRENDING:

Eggs Intake : रोज अंडी खावीत का ? रोज किती अंडी खाणं तब्येतीसाठी सुरक्षित ? जाणून घेऊया पचनविकार तज्ज्ञांचा सल्ला

Last Updated:

अंडी खाल्ल्यानं लठ्ठपणा कमी होऊ शकतो का ? नाश्त्यात अंडी खावीत की नाही ?  कोलेस्टरॉल आणि फॅटी लिव्हरसारख्या समस्या असतील तर अंडी खावीत का? गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट सौरभ सेठी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत डॉक्टरांनी अंड्यांशी संबंधित प्रश्नांची उत्तरं दिली आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : आपल्या आहारावर आपली तब्येत अवलंबून असते. शाकाहार असो किंवा मांसाहार यातून तब्येतीला किती पोषक घटक मिळतायत हे पाहणं महत्त्वाचं.
News18
News18
advertisement

अंडी म्हणजे आरोग्यासाठी सुपरफूड मानलं जातं. त्यात आपल्या शरीराला आवश्यक असलेले सर्व पोषक घटक मोठ्या प्रमाणात असतात. काहींना तब्येतीसाठी अंडी खाण्याचा सल्ला दिला जातो तर काहींच्या आहारात अंडी दररोज असतात. पण, अनेकांच्या मनात अंड्यांबद्दल काही प्रश्न असतात.

अंडी खाल्ल्यानं लठ्ठपणा कमी होऊ शकतो का ? नाश्त्यात अंडी खावीत की नाही ?  कोलेस्टरॉल आणि फॅटी लिव्हरसारख्या समस्या असतील तर अंडी खावीत का? गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट सौरभ सेठी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत डॉक्टरांनी अंड्यांशी संबंधित प्रश्नांची उत्तरं दिली आहेत.

advertisement

Detox Drink : चेहऱ्यावरच्या नॅचरल ग्लोसाठी बनवा खास डिटॉक्स ड्रिंक, पाहूया कृती

नाश्त्यात अंडी खावीत का? - डॉ. सेठी यांच्या मते, अंडी नाश्त्यासाठी सर्वोत्तम प्रथिन स्रोतांपैकी एक आहेत. त्यात उच्च दर्जाची प्रथिनं असतात, यामुळे पोट बराच काळ भरलेलं राहतं आणि दिवसभर ऊर्जा मिळते. त्यामुळे, नाश्त्यात अंडी खाऊ शकता.

अंडी खाल्ल्यानं वजन वाढतं की कमी होतं ? - योग्य प्रमाणात खाल्ली तर अंडी वजन कमी करण्यास मदत करू शकतात. अंड्यातील प्रथिनांमुळे भूक कमी होते, भूक लागण्याची तल्लफ कमी होते आणि विशेषतः पोटाची चरबी कमी करण्यास मदत करतात.

advertisement

अंडी खाल्ल्यानं कोलेस्ट्रॉल वाढतें का ? - अंड्यातील पिवळा भाग बहुतेकदा कोलेस्टेरॉलशी जोडला जातो, परंतु डॉ. सेठी यांच्या मते, अंडी खाल्ल्यानं बहुतेकांमधे कोलेस्टेरॉल वाढत नाही.

फॅटी लिव्हर असेल तर तुम्ही अंडी खाऊ शकता का ? - फॅटी लिव्हरचे रुग्ण देखील कमी प्रमाणात अंडी खाऊ शकतात, कारण त्यातील प्रथिनं यकृताच्या आरोग्याला मदत करतात.

advertisement

रक्तातील साखर आणि मधुमेह असलेल्यांसाठी अंडी किती चांगली आहेत ? - अंड्यांमध्ये जवळजवळ शून्य कार्बोहायड्रेट्स असतात, त्यामुळे ते रक्तातील साखर वाढवत नाहीत. मधुमेही देखील डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर आहारात अंडी समाविष्ट खाऊ शकतात.

अंड्यांमुळे गॅस होतो किंवा पोटफुगी होते का ? - बहुतेकांना अंडी खाण्यानं कोणतीही समस्या येत नाही. पण काहींना त्याचा त्रास होऊ शकतो, म्हणून शरीराची प्रतिक्रिया समजून घेणं महत्वाचं आहे.

advertisement

Hair Care : हिरवी भाजी करेल केसांवर जादू, ऋजुता दिवेकरांनी सांगितलंय सीक्रेट

कच्चं अंड चांगलं की शिजवलेलं ? - कच्चं अंडं आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात. त्यामुळे साल्मोनेला विषाणूच्या संसर्गाचा धोका असतो. म्हणून, नेहमी शिजवलेलं अंडं खा. शिजवलेल्या अंड्यांतील प्रथिनं शरीर चांगल्या प्रकारे शोषून घेतं.

अंडी खाण्याचा सर्वात आरोग्यदायी मार्ग कोणता ? - अंडी उकडलेली, शिजवलेली, थोडी भाजलेली किंवा ऑम्लेट बनवून खाऊ शकता.

एका दिवसात किती अंडी खावीत ? - दररोज एक ते दोन अंडी खाणं बहुतेकांसाठी सुरक्षित आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
15 वर्षांच्या पूजाच्या मागे लागला साप? 3 महिन्यात 7 वेळा केला दंश, जालन्यातील...
सर्व पहा

डॉ. सेठी यांच्या मते, अंडी हे स्वस्त, पौष्टिक आणि सहज उपलब्ध होणारं सुपरफूड आहे. योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीनं खाल्लं तर वजन कमी करण्यासाठी, स्नायूंच्या वाढीसाठी आणि एकूण आरोग्यासाठी अंडी फायदेशीर असतात.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Eggs Intake : रोज अंडी खावीत का ? रोज किती अंडी खाणं तब्येतीसाठी सुरक्षित ? जाणून घेऊया पचनविकार तज्ज्ञांचा सल्ला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल