चांगली झोप आपल्या शरीरासाठी आणि मनासाठी आवश्यक आहे. झोपेच्या कमतरतेमुळे दिवसभर थकवा, चिडचिड आणि लक्ष केंद्रित न होणं यासारख्या समस्या उद्भवू शकतात. रात्री झोपूनही बरेच जण झोप न झाल्याची तक्रार करतात. सकाळी त्यांना थकवा जाणवतो.
यातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, वेगवेगळ्या वयोगटातील लोकांना वेगवेगळ्या प्रमाणात झोपेची आवश्यकता असते. याचा अर्थ असा की आवश्यक तासांची संख्या वयानुसार बदलते.
advertisement
ऑर्थोपेडिक सर्जन आणि आरोग्य तज्ज्ञ डॉ. मनन व्होरा यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर याबद्दल एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत डॉक्टरांनी प्रत्येक वयात किती तासांची झोप आवश्यक आहे हे स्पष्ट केलं आहे.
Periods : वेदनादायक पाळी होईल सुसह्य, तज्ज्ञांनी दिलेल्या डाएट टिप्सचा करा वापर
नवजात आणि लहान मुलं -
नवजात बालकांना (०-तीन महिने) या वयात सर्वात जास्त झोपेची आवश्यकता असते. या वयात दिवसाला अंदाजे 14-17 तास झोपेची गरज असते असं डॉ. व्होरा म्हणतात. त्याचप्रमाणे, 4-11 महिने वयोगटातील मुलांना 12-15 तास आणि 1-2 वर्ष या वयोगटातील मुलांना अंदाजे 11-14 तास झोप आवश्यक असते. या वयात मुलांच्या वाढीसाठी झोप अत्यंत महत्त्वाची असते.
शाळेत जाणरी मुलं -
तीन-पाच वर्षं वयोगटातील मुलांना दिवसातून दहा-चौदा तास झोपण्याची गरज आहे. यामुळे त्यांचा मूड सुधारतो आणि त्यांची शिकण्याची क्षमता वाढते. दरम्यान, सहा-तेरा वर्ष वयोगटातील मुलांना नऊ-अकरा तासांची झोप आवश्यक असते.
किशोर आणि तरुण -
चौदा-सतरा वर्षं वयोगटातील किशोरांनी आठ-दहा तास झोपावं. दरम्यान, अठरा-पंचवीस वर्षे वयोगटातील तरुणांना सात-नऊ तासांची झोप आवश्यक आहे. यामुळे त्यांचा मेंदू चांगल्या प्रकारे कार्य करू शकतो.
Facial Hair : चेहऱ्यावरचे केस कमी करण्यासाठी नैसर्गिक पेय, फेस एक्स्पर्टनी दिलेत सोपे पर्याय
प्रौढ आणि वृद्ध
26 - 64 वयोगटातील प्रौढांसाठी दररोज 7-9 तासांची झोपण्याची शिफारस डॉक्टरांनी केली आहे. पासष्ट वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रौढांसाठी 7-8 तास झोप पुरेशी आहे.
वेगवेगळ्या वयोगटात झोपेची गरज वेगवेगळी असते. मुलांना आणि किशोरांना जास्त झोपेची आवश्यकता असते, तर प्रौढांना कमी तासांची आवश्यकता असू शकते. चांगली झोप केवळ थकवा दूर करत नाही तर रोगप्रतिकारक शक्ती देखील मजबूत करते. त्यामुळे वयानुसार पुरेशी झोप घ्या आणि निरोगी जीवनशैली स्वीकारण्याचा प्रयत्न करा.