फिटनेससाठी आपल्याला दररोज तासन्तास जिममधे जाण्याची गरज आहे का, की थोडं चालल्यानं हे शक्य होतं अशा अनेक प्रश्नांवर जागतिक आरोग्य संघटनेनं उत्तर दिलंय. WHO च्या मार्गदर्शक तत्वांनुसार, निरोगी जीवन जगण्यासाठी दर आठवड्याला किमान 150 ते 300 मिनिटं चालणं किंवा सायकलिंग अशी 'मॉडरेट एरोबिक फिजिकल एक्टिव्हिटी करणं आवश्यक आहे. यामुळे, शरीर सक्रिय आणि निरोगी ठेवण्यास मदत होते.
advertisement
Vitamins Deficiency : हातांची थरथर का होते ? वेळीच व्हा सावध, जाणून घ्या कारणं
स्नायूंची ताकद - केवळ एरोबिक व्यायाम पुरेसा नाही. तर स्नायूंना बळकटी देणाऱ्या व्यायामांवर लक्ष केंद्रित करणंही गरजेचं आहे. आठवड्यातून दोनदा किंवा त्याहून अधिक वेळा करावं असा सल्ला WHOच्या मार्गदर्शक तत्त्वांमधे देण्यात आला आहे. शरीराची ताकद राखण्यासाठी हे आवश्यक आहे.
सुस्त जीवनशैली नको - आपल्यापैकी बरेच जण बैठी जीवनशैली जगतो आहोत, म्हणजे आपण आपला बहुतेक दिवस बसून घालवतो. डॉक्टरांच्या मते, तुमची जीवनशैली अशी असेल, तर त्याचे नकारात्मक परिणाम कमी करण्यासाठी तुम्ही आठवड्यातून तीनशे मिनिटांपेक्षा जास्त व्यायाम करण्याचं ध्येय ठेवलं पाहिजे. सतत बसल्यामुळे झालेलं नुकसान या व्यायामांनी भरून काढण्यास मदत होते.
Brainstorming : शरीराप्रमाणेच मेंदूलाही असते व्यायामाची गरज, वाचा कारणं-उत्तरं
आजारी असलात तरी थोडे व्यायाम करा - व्यायामाचे हे नियम केवळ पूर्णपणे निरोगी लोकांसाठी नाहीत.
तर उच्च रक्तदाब, टाइप 2 मधुमेह, एचआयव्ही किंवा कर्करोगानं अशा आजारांनी ग्रस्त असलेल्यांनाही हीच मार्गदर्शक तत्त्वं लागू होतात. या परिस्थितीत योग्य प्रमाणात व्यायाम करणं तितकेच महत्त्वाचं आहे.
प्रत्येकाची प्रकृती वेगळी असते त्यामुळे प्रत्येकानं कसा, कोणता व्यायाम करावा यासाठी प्रशिक्षकांचा सल्ला अवश्य घ्या.
