Vitamins Deficiency : हातांच्या थरथरण्याकडे दुर्लक्ष नको, असू शकतं गंभीर आजाराचं लक्षण, वाचा कारणं - उपचारांविषयीची सविस्तर माहिती
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
खनिजं, जीवनसत्त्वांच्या कमतरतेचा परिणाम केवळ मज्जासंस्थेवरच नाही तर स्नायू आणि हाडांच्या आरोग्यावरही होतो. म्हणून, या लक्षणाकडे दुर्लक्ष करु नका आणि वेळेत कारण, लक्षणं समजून घ्या आणि आरोग्याकडे लक्ष द्या.
मुंबई : अंगाची थरथर होणं किंवा केवळ हात - पायांची थरथर होणं असा त्रास काहींना जाणवतो. हाताची थरथर होणं याकडे बहुतेकदा थकवा किंवा वृद्धत्वाचं लक्षण म्हणून पाहिलं जातं. परंतु वारंवार आणि सतत हात थरथरणं हे एखाद्या कमतरतेचं लक्षण असू शकतं, विशेषतः जीवनसत्व आणि खनिजांच्या कमतरतेमुळे असं होऊ शकतं.
खनिजं, जीवनसत्त्वांच्या कमतरतेचा परिणाम केवळ मज्जासंस्थेवरच नाही तर स्नायू आणि हाडांच्या आरोग्यावरही होतो. म्हणून, या लक्षणाकडे दुर्लक्ष करु नका आणि वेळेत कारण, लक्षणं समजून घ्या आणि आरोग्याकडे लक्ष द्या.
हात थरथरण्याची मुख्य कारणं -
जीवनसत्त्वं आणि खनिजांची कमतरता - जीवनसत्त्वं बी 12, डी, ई, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि पोटॅशियमची कमतरता यामुळे हातांची थरथर होऊ शकते.
advertisement
थकवा आणि ताण - ताण, झोपेचा अभाव आणि मानसिक त्रास यामुळेही हात थरथरू शकतात. रक्तातील साखरेचं प्रमाण कमी होणं - मधुमेह किंवा दीर्घकाळ उपवासामुळेही थरथर होऊ शकते.
थायरॉईड - हायपरथायरॉईडीझम असलेल्या रुग्णांमधे ही समस्या अधिक सामान्य आहे.
मज्जासंस्थेचे विकार - कमकुवतपणा किंवा नसांना नुकसान झाल्यामुळे हातांना थरथर येऊ शकते.
लक्षणं
advertisement
हात आणि बोटांमध्ये सौम्य किंवा तीव्र थरथर होणं.
लवकर अशक्तपणा आणि थकवा जाणवणं.
स्नायूंमधे ताण किंवा कडकपणा.
हात आणि पाय सुन्न होणं किंवा मुंग्या येणं.
लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणं आणि चक्कर येणं.
काही प्रकरणांमध्ये, हृदयाचे ठोके जलद होणं.
व्हिटॅमिन बी12 - मज्जातंतूंच्या बळकटीसाठी आणि मेंदूच्या कार्यासाठी आवश्यक आहे. याच्या कमतरतेमुळे सुन्नपणा, थकवा आणि हातांची थरथर होऊ शकते. यासाठी, दूध, दही, चीज, अंडी, सोया आणि मशरूम खाणं हे चांगले पर्याय आहेत.
advertisement
व्हिटॅमिन डी - स्नायू आणि हाडांच्या मजबुतीसाठी हे जीवनसत्त्व आवश्यक आहे. याच्या कमतरतेमुळे स्नायू कमकुवत होऊ शकतात आणि थरथर कापू शकतात. यासाठी, सकाळच्या सूर्यप्रकाशात जाणं, अंड्याचा पिवळा भाग, मशरूम आणि फोर्टिफाइड अन्न आवश्यक आहे.
व्हिटॅमिन ई - नसा आणि स्नायूंच्या आरोग्यासाठी आवश्यक जीवनसत्त्व. याच्या कमतरतेमुळे नसा खराब होऊ शकतात आणि हाताला थरथर येऊ शकते. बदाम, अक्रोड, पालक आणि सूर्यफुलाच्या बिया यामधे व्हिटॅमिन ई असतं.
advertisement
मॅग्नेशियम - शरीरातील नसा आणि स्नायूंना यामुळे आराम मिळतो. कमतरतेमुळे पेटके आणि हात थरथरणं होऊ शकतं. काजू, बदाम, हिरव्या पालेभाज्या आणि कडधान्यं खाण्यानं मॅग्नेशियमची कमतरता भरुन निघते .
कॅल्शियम - स्नायू आणि हाडांच्या बळकटीसाठी कॅल्शियम आवश्यक आहे. त्याच्या कमतरतेमुळे हात आणि पायांमधे अशक्तपणा आणि थरथर येते. दूध, चीज, तीळ आणि पालक हे कॅल्शियम पोषक घटक आहेत.
advertisement
पोटॅशियम - नसा आणि स्नायूंसाठी एक महत्त्वाचे इलेक्ट्रोलाइट आहे. पोटॅशियम कमतरतेमुळे स्नायू कमकुवत होऊ शकतात आणि थरथर कापू शकतात. केळी, नारळ पाणी आणि कडधान्य हे पोटॅशियमचे चांगले स्रोत आहेत.
केवळ थकव्यामुळे हातांची थरथर होत नाही तर ते पौष्टिक कमतरतेचंही लक्षण असू शकतं. जीवनसत्त्वं आणि खनिजांनी समृद्ध आहार, पुरेशी झोप, ताण व्यवस्थापन आणि नियमित तपासणी यासाठी आवश्यक आहे. लक्षणं कायम राहिली तर वेळेवर उपचार मिळण्यासाठी ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 19, 2026 9:05 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Vitamins Deficiency : हातांच्या थरथरण्याकडे दुर्लक्ष नको, असू शकतं गंभीर आजाराचं लक्षण, वाचा कारणं - उपचारांविषयीची सविस्तर माहिती









