Ravindra Jadeja : 'जडेजासाठी कठीण काळ, तो जागा घ्यायला तयार' अश्विनने खेळाडूचं नाव घेऊन सांगितलं!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
रवींद्र जडेजाच्या वनडे क्रिकेटमधल्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे, कारण या सीरिजमधली जडेजाची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली आहे.
मुंबई : रवींद्र जडेजाच्या वनडे क्रिकेटमधल्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे, कारण या सीरिजमधली जडेजाची कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली आहे. रवींद्र जडेजाला संपूर्ण सीरिजमध्ये एकही विकेट मिळाली नाही. तसंच तिन्ही सामन्यांमध्ये मिळून जडेजाला बॅटिंगमध्येही 50 रनही करता आल्या नाहीत, त्यामुळे जडेजा वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेणार का? अशा चर्चा सुरू आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू रवीचंद्रन अश्विनने तर जडेजाची जागा घेण्यासाठी एक खेळाडू तयार असल्याचं वक्तव्य केलं आहे.
बडोद्यामध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात रविंद्र जडेजाने 56 रन दिल्या आणि फक्त 4 रन केल्या. राजकोटमध्ये त्याने 44 रन दिल्या आणि बॅटने 27 रन केल्या. इंदूरमधील निर्णायक सामन्यात त्याने 41 रन दिल्या आणि अनावश्यक शॉट खेळल्यानंतर 12 रन करून आऊट झाला.
अश्विनच्या मते, वनडे क्रिकेटमध्ये जडेजासाठी हा कठीण काळ आहे, कारण जर त्याने मोठी चूक केली तर अक्षर पटेल त्याची जागा घेण्यास तयार आहे. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीपासून जडेजाची कामगिरी खराब झाली आहे.
advertisement
अश्विन काय म्हणाला?
यूट्यूब चॅनलवरील 'ऍश की बात' दरम्यान अश्विन म्हणाला, "हा जडेजासाठी खूप कठीण काळ आहे. मला माहित आहे की अक्षर पटेल त्याच्या मागे तयार आहे. सत्य हे आहे की जडेजाने वनडे सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे आणि तो टेस्ट फॉरमॅटमध्येही खेळत आहे. पण जडेजासाठी हे सोपे नाही कारण चिंता त्याच्या बॅटिंगबद्दल जास्त आहे. स्पिनरविरुद्ध त्याचा स्ट्राईक रेट कमी आहे.'
advertisement
अश्विन पुढे म्हणाला, 'यानंतर, टी-20 वर्ल्ड कप आणि आयपीएल आहे. जडेजा आयपीएलमध्ये खेळेल आणि तेथील त्याच्या कामगिरीच्या आधारे निर्णय घेतला जाईल. आत्ता कोणताही निर्णय घेणे खूप लवकर आहे. जडेजाने आणखी प्रयोग केले पाहिजेत. खेळात एक दिग्गज म्हणून, त्याच्याकडे गमावण्यासारखे काहीही नाही.'
'जडेजाची ताकद कधीकधी त्याची कमकुवतपणा बनते. कधीकधी मला त्याच्या बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंगमधील प्रतिभेचा हेवा वाटतो. पण तो एकही गोष्ट करत नाही; तो कधीही त्याच्या ताकदींपेक्षा जास्त जात नाही. त्याने कधीही नवीन गोष्टींचा प्रयोग केलेला नाही. तो खरा दिग्गज आहे. त्याच्याकडे गमावण्यासारखे काहीही नाही, म्हणून मला तो प्रयोग करताना पहायला आवडेल. मी त्याला नेट प्रॅक्टिसमध्ये कॅरम बॉल टाकताना पाहिले आहे, पण त्याने कधीही सामन्यात ते केले नाही', असं अश्विन म्हणाला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 19, 2026 11:48 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Ravindra Jadeja : 'जडेजासाठी कठीण काळ, तो जागा घ्यायला तयार' अश्विनने खेळाडूचं नाव घेऊन सांगितलं!








