T20 वर्ल्ड कपमध्ये खळबळजनक ट्विस्ट, बांगलादेशनंतर पाकिस्तानचाही स्पर्धेवर बहिष्कार?

Last Updated:
भारतात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपवरून सुरू असलेला वाद कमी व्हायचं नाव घेत नाहीये. बांगलादेशनंतर आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही धक्कादायक पाऊल उचललं आहे.
1/7
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने टी-20 वर्ल्ड कपसाठी भारतात खेळायला नकार दिला आहे, त्यानंतर आयसीसीने बांगलादेशला 48 तासांची डेडलाईन दिली आहे. बांगलादेश भारतात खेळायला तयार नसेल, तर दुसरी टीम वर्ल्ड कप खेळेल, असा इशारा आयसीसीने दिला आहे.

advertisement
2/7
बांगलादेशने टी-20 वर्ल्ड कप खेळायला नकार दिला, तर स्कॉटलंडची टीम बांगलादेशची जागा घेऊ शकते. स्कॉटलंड ही क्वालिफाय न झालेल्या टीममधली सर्वोत्तम क्रमवारी असलेली आहे, त्यामुळे त्यांना वर्ल्ड कप खेळण्याची संधी मिळू शकते.

3/7
एकीकडे बांगलादेशची वर्ल्ड कपमधून हकालपट्टी व्हायची शक्यता असतानाच पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही अनपेक्षित आणि धक्कादायक पाऊल उचललं आहे. पीसीबी अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी पाकिस्तान टीम मॅनेजमेंटला वर्ल्ड कपसंबंधी सर्व नियोजन थांबवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

4/7
पुढील सूचना येईपर्यंत टी-20 वर्ल्ड कपची तयारी करू नका, असे आदेश मोहसिन नक्वी यांनी पाकिस्तानच्या टीमला दिले आहेत. बांगलादेशला नैतिक पाठिंबा देण्यासाठी पाकिस्तानने हे पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे.

5/7
खेळाडूंच्या सुरक्षेचं कारण देऊन बांगलादेशने भारतात खेळायला नकार दिला आहे. बांगलादेशच्या या भूमिकेला पाकिस्तानने पाठिंबा दिला आहे. खेळाडूंची सुरक्षा सर्वोच्च प्राथमिकता असली पाहिजे, असं पीसीबीने सांगितलं आहे.

6/7
पाकिस्तानने उचललेलं हे पाऊल म्हणजे फक्त दबाव निर्माण करण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न असल्याचं सांगण्यात येत आहे. शेवटच्या क्षणी वर्ल्ड कपचं वेळापत्रक आणि ठिकाणं बदलण्यात येणार नाहीत, त्यामुळे बांगलादेशने 21 जानेवारीपर्यंत निर्णय घ्यावा, असं आयसीसीने स्पष्ट केलं आहे.

7/7
बांगलादेशने वर्ल्ड कपवर बहिष्कार टाकला, तर पाकिस्तान टीमही वर्ल्ड कपमधून माघार घ्यायचा विचार करू शकते, अशी वृत्त प्रसिद्ध झाली आहेत. वर्ल्ड कपची तयारी थांबवण्याचे पाकिस्तानचे आदेश हे धमकी ठरणार? का खरंच पाकिस्तान माघार घेणार हे 21 जानेवारीला स्पष्ट होईल.

Nagpur News: 'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने नवरा तुरुंगात, आता थेट नगरसेवक!
'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने तुरुंगात आता थेट नगरसेवक
  • यंदाच्या महापालिका निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या असून काही आश्चर्यकारक निकाल ला

  • बुलडोझरच्या धक्क्याने या कुटुंबातील एका महिलेला थेट महापालिकेच्या सभागृहात पोहोच

  • अलिशा खान यांच्या रूपाने 'बुलडोझर पॉलिटिक्स'ला मतदारांनी चपराक दिल्याची चर्चा

View All
advertisement